Advertisement

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 7: गवताचे पाते

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

आकृती पूर्ण करा.

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

रूपक कथेची वैशिष्ट्ये :

१) रूपक कथा आकाराने लहान

२) अर्थघनत्व

३) आशय समृद्धी

४) सूचकता

५) नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता

६) वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो.

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये :

१) स्वप्नाळू

२) किरकिरा

३) अरसिक

४) चिडखोर

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

पानाची स्वभाव वैशिष्ट्ये :

१) पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते.

२) गवतपात्याला क्षुद्र मानते.

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह :

१) चिमणे

२) चिडखोर बिब्बा

३) क्षुद्र

४) अरसिक

५) चिमुकले

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

कारणे लिहा.

झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण ______ 

SOLUTION

झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली; कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता. 

‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण ______

SOLUTION

'अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही,' असे गळून पडणारे पान म्हणाले; कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी 'आ' सुद्धा केला नव्हता.

वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण ______ 

SOLUTION

वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले; कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

बेजबाबदारपणा

SOLUTION

जर, जप, दाब, दार, दाणा, बाब, बाप, बाणा, बेजबाब, जबाब, बेजबाबदार

धरणीमाता 

SOLUTION

धरणीमाता -

धर

धरणी

रणी

तार

रमा

मार

माता

बालपण

SOLUTION

बालपण -

बाल

बाप

बाण

लप

पण

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.

      कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्‌धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय

SOLUTION

कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, "गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे." ते म्हणाले, "तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू!" यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, “सर, शून्याला शून्याने भागले तर?" त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले 'श्रीनिवास रामानुजन' होय.

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?

(अ) ज्ञानी × सुज्ञ

(आ) निरर्थक × अर्थपूर्ण

(इ) ऐच्छिक × अनिवार्य

(ई) दुर्बोध × सुबोध

SOLUTION

ज्ञानी × सुज्ञ

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]
स्वमत

‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

SOLUTION

माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत... वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.

गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?

SOLUTION

मी गवतपाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते :

"आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात. मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वत:चेच बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते.

आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हांला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हांला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो. म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हांला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता, या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही.

आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला. स्वत:च्या प्रकृतीला जपा.

गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.

SOLUTION

हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.

पट... पट... पट...

त्यांचा तो पट... पट... पट... असा कर्णकटू आवाज

तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलंबिगलं तर नाही ना?"

पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे?"

"छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?"

"काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार?"

“असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!"

हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले.

ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडांवर पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!

ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित!

Chapter 7 - गवताचे पाते Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा. 

‘‘...एक विचारू?’’

उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले.

‘‘हं.’’

‘‘मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय... पण..’’

‘‘पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?’’

‘‘...हो.’’

‘‘अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..’’

‘‘पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?’’

‘‘हो! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात...’’

...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला!

                                                                              (गुलमोहर)

SOLUTION

रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपांत अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदेकानून, नीती-नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.

Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

 • Chapter 1: जय जय हे भारत देशा

 • Chapter 2: बोलतो मराठी

 • Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ

 • Chapter 4: उत्तमलक्षण

 • Chapter 5.1: वसंतहृदय चैत्र

 • Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर

 • Chapter 6: वस्तू

 • Chapter 7: गवताचे पाते

 • Chapter 8: वाट पाहताना

 • Chapter 9: आश्वासक चित्र

 • Chapter 10.1: आप्पांचे पत्र

 • Chapter 10.2: मनक्या पेरेन लागा

 • Chapter 11: गोष्ट अरुणिमाची

 • Chapter 12: भरतवाक्य

 • Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे

 • Chapter 14: काळे केस

 • Chapter 15.1: खोद आणखी थोडेसे

 • Chapter 15.2: वीरांगना

 • Chapter 16: आकाशी झेप घे रे

 • Chapter 17: सोनाली

 • Chapter 18: निर्णय

 • Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक

 • Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी

 • Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश

 • Chapter 20.3: उपयोजित लेखन

Author: Balbharati

Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research

Language: Marathi

.