Chapter 5: वसंतहृदय चैत्र
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : निळसर फुलांचे तुरे
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : निळसर फुलांचे तुरे
झाडाचे/वेलीचे नाव : करंजाचे झाड
वैशिष्ट्ये : गुलाबी रंगांची कोवळी पालवी
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : गुलाबी रंगांची कोवळी पालवी
झाडाचे/वेलीचे नाव : पिंपळ
वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद
झाडाचे/वेलीचे नाव : मधुमालती
वैशिष्ट्ये : कडवट उग्र वास
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : कडवट उग्र वास
झाडाचे/वेलीचे नाव : करंजाचे झाड
वैशिष्ट्ये : दुरंगी फुले
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : दुरंगी फुले
झाडाचे/वेलीचे नाव : घाणेरी
वैशिष्ट्ये : तीन पाकळ्यांचे फूल
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : तीन पाकळ्यांचे फूल
झाडाचे/वेलीचे नाव : माडाचे झाड
वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळ
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळ
झाडाचे/वेलीचे नाव : फणस
खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे
SOLUTION
वसंतऋतूतील सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षांवर बोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे, यांमुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रातच होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.
काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
SOLUTION
अवतीभवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो.
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
(१) लांबलचक देठ | (अ) माडाच्या लोंब्या |
(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी | (आ) कैऱ्याचे गोळे |
(३) भुरभुरणारे जावळ | (इ) करंजाची कळी |
SOLUTION
अ' गट | उत्तरे : |
---|---|
(१) लांबलचक देठ | कैऱ्याचे गोळे |
(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी | करंजाची कळी |
(३) भुरभुरणारे जावळ | माडाच्या लोंब्या |
खालील तक्ता पूर्ण करा.
शब्द | अर्थ |
---|---|
निष्पर्ण | पाने निघून गेलेला |
निर्गंध | ______ |
निर्वात | ______ |
निगर्वी | ______ |
नि:स्वार्थी | ______ |
SOLUTION
शब्द | अर्थ |
---|---|
निष्पर्ण | पाने निघून गेलेला |
निर्गंध | गंध निघून गेलेला |
निर्वात | हवा नसलेला |
निगर्वी | गर्व नसलेला |
नि:स्वार्थी | स्वार्थ नसलेला |
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.
शब्द | प्रत्यय | त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द |
---|---|---|
(१) अतुलनीय | ______ | ______ |
(२) प्रादेशिक | ______ | ______ |
(३) गुळगुळीत | ______ | ______ |
(४) अणकुचीदार | ______ | ______ |
SOLUTION
शब्द | प्रत्यय | त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द |
---|---|---|
(१) अतुलनीय | नीय | प्रशंसनीय |
(२) प्रादेशिक | इक | सामाजिक |
(३) गुळगुळीत | ईत | मुळमुळीत |
(४) अणकुचीदार | दार | टोकदार |
खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा.
अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. - ______ ______
SOLUTION
अश्विनी - विशेष नाम, पुस्तक - सामान्य नाम
अजय आजच मुंबई हून परत आला - ______ ______
SOLUTION
अजय - विशेष नाम, मुंबई - विशेष नाम
गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते - ______ ______
SOLUTION
गुलाब - विशेष नाम, सौंदर्य - भाववाचक नाम
रश्मी च्या आवाजात वेगळाच गोडवा आहे - ______ ______
SOLUTION
रश्मी - विशेष नाम, गोडवा - भाववाचक नाम
खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.
जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.
(अ) कर्ण - ______
(आ) सोबती - ______
(इ) मार्ग - ______
(ई) हर्ष - ______
SOLUTION
(अ) कर्ण - कान
(आ) सोबती - मित्र
(इ) मार्ग - वाट
(ई) हर्ष - आनंद
स्वमत.
चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतू आला. वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंत ऋतु ऐन भरात आलेला असतो, त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ते पिंपळाचीच. किंबहुना पिंपळ पानांच्या सळसळीवरूनच 'झाडांच्या पानांची सळसळ' हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषण चित्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.
चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.
SOLUTION
चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगाचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत. पक्ष्यांची घरटी सुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही लोंबत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील असतात. ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. म्हणून ती विरामचिन्हे ठरतात.
वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.
SOLUTION
आम्ही एकदा आमच्या गावी गेलो होतो. वसंतऋतूच होता तो. त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो, काही खायला नको किंवा काही प्यायला नको, फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे, असेच फिरत असताना आम्रफुलांचा सुगंध आला, आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले. झाड मोहराने भरलेले होते. अनेक फांदयांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले, नकळत आमच्या हातात दगड आलेच. ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एकजण कळवळला. झाडावर दगड मारण्यामुळे त्याला वेदना झाल्या होत्या. त्याने आम्हांला थांबवले. स्वतः झाडावर चढला. आम्हांला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेलो. आईने मीठ-मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले. आणि काय सांगू? हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यादिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही. अजूनही वसंतऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच.
Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]
- Chapter 1: जय जय हे भारत देशा
- Chapter 2: बोलतो मराठी
- Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ
- Chapter 4: उत्तमलक्षण
- Chapter 5.1: वसंतहृदय चैत्र
- Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
- Chapter 6: वस्तू
- Chapter 7: गवताचे पाते
- Chapter 8: वाट पाहताना
- Chapter 9: आश्वासक चित्र
- Chapter 10.1: आप्पांचे पत्र
- Chapter 10.2: मनक्या पेरेन लागा
- Chapter 11: गोष्ट अरुणिमाची
- Chapter 12: भरतवाक्य
- Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे
- Chapter 14: काळे केस
- Chapter 15.1: खोद आणखी थोडेसे
- Chapter 15.2: वीरांगना
- Chapter 16: आकाशी झेप घे रे
- Chapter 17: सोनाली
- Chapter 18: निर्णय
- Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक
- Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी
- Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश
- Chapter 20.3: उपयोजित लेखन
कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ (Difficult Words and Their Meanings)
- वसंतहृदय (Vasantahrudaya) - The heart of spring; the essence of springtime (वसंताचे सार).
- पालवी (Paalavi) - New tender leaves, fresh foliage (नवीन कोवळी पाने).
- तुरे (Ture) - Clusters or bunches, especially of flowers (फुलांचे घोस).
- गर्द (Garda) - Dense, thick (दाट).
- न्याहाळणे (Nyahalane) - To gaze at, to observe intently (निरखून पाहणे).
- रेंगाळणे (Rengaalane) - To linger, to dawdle (घुटमळणे, रेंगाळणे).
- निष्पर्ण (Nishparna) - Leafless (पाने नसलेला).
- निर्गंध (Nirgandha) - Without fragrance, odorless (गंध नसलेला).
- वाक्प्रचार (Vaakprachaar) - Idiom (विशिष्ट अर्थ असलेला शब्दसमूह).
- रुंजी घालणे (Runji ghaalane) - To hover around (like bees), often with a humming sound (भोवती फिरणे, गुंजारव करणे).
- व्यथित होणे (Vyathit hone) - To be distressed, to become sad or pained (दुःखी होणे, त्रासणे).
- अणकुचीदार (Ankuchidaar) - Pointed, sharp-tipped (टोकदार).
- विलोभनीय (Vilobhaneeya) - Fascinating, enchanting, very attractive (अतिशय सुंदर, मोहक).
- हृदयंगम (Hridayangam) - Heart-touching, appealing to the heart (मनाला भिडणारे).
- उत्कट (Utkat) - Intense, profound, fervent (तीव्र, उत्कट).