Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

बैठे खेळ

(१) चिंचोके

(२) गजगे

(३) खापराच्या भिंगर्‍या

(४) जिबल्या

(५) मुगळा

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

मैदानी खेळ

(१) विटीदांडू 

(२) भोवरे

(३) कुरीचा डाव

(४) गोटया

(५) सुरपारंब्या

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

आजीचे दिसणे : आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.

आजीचे राहणीमान : त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.

आजीची शिस्त : आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट  ‘ब’ गट

(१) आळस

(अ) अनास्था

(२) आदर

(आ) दुरावा

(३) आस्था

(इ) उत्साह

(४) आपुलकी

(ई) अनादर

SOLUTION

'अ' गट उत्तर :

(१) आळस

उत्साह

(२) आदर

अनादर

(३) आस्था

अनास्था

(४) आपुलकी

दुरावा

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

SOLUTION

सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

SOLUTION

दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

SOLUTION

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

समुद्रकिनारी ______ सहल गेली होती.

OPTIONS

  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची

उत्तर: समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.

खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ______ झाला.

OPTIONS

  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची

उत्तर: खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्‌विगुणित झाला.

विजय अजयपेक्षा ______ चपळ आहे.

OPTIONS

  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची

उत्तर: विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे.

रवीला ______ कैऱ्या खायला खूप आवडतात.

OPTIONS

  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची

उत्तर: रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात.

मला गाणी ऐकण्याची ______ आवड आहे.

OPTIONS

  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची

उत्तर: मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.

राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु  ______ पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

OPTIONS

  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची

उत्तर: राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु  त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा.

______ वर ______

SOLUTION

वरची बाजू वर नवरा
______ ग्रह ______

SOLUTION

तारा ग्रह समज
______ काठ ______

SOLUTION

किनारा काठ लुगड्याची किनार
______ अभंग ______

SOLUTION

न भंगणारे अभंग एक छंद (काव्य प्रकार)
Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 3 - आजी : कुटुंबाचं आगळ Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

स्वमत.

‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

SOLUTION

'आगळ' या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची.

वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्र सारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.

तुलना करा/साम्य लिहा.

आगळ - वाड्याचे कवच, आजी - कुटुंबाचे संरक्षक कवच

SOLUTION

आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते.

प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते.

पाठात (आजी : कुटुंबाचं आगळ) चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.

SOLUTION

या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती, कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे.

या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात; याचा कुटुंबालाच फायदा होतो, हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वतंत्र राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.

पाठाच्या (आजी : कुटुंबाचं आगळ) शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा.

SOLUTION

ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते.

पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई, कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून 'आजी : कुटुंबाचं आगळ' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

Author: Balbharati

Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research

Language: Marathi

पाठामधील काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ (Difficult Words and Their Meanings)

  • आगळ (Aagal): A strong, large wooden crossbar used to secure the main door of a traditional house. (दाराला लावायचा मोठा लाकडी अडसर)
  • ढाळज (Dhaalaj): A front verandah or an extended covered platform at the entrance of old traditional houses. (घराच्या पुढील भागातील ओसरी किंवा मोठा व्हरांडा)
  • विटीदांडू (Viti-dandu): A traditional Indian street game played with two sticks: a large one (dandu) and a smaller one (viti). (एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ)
  • सुरपारंब्या (Surparambya): A traditional children's outdoor game, often involving chasing, tagging, and sometimes climbing trees. (एक पारंपरिक मैदानी खेळ)
  • इरकली लुगडे (Irkali Lugade): A type of traditional nine-yard saree, typically handwoven, originating from the town of Irkal in Karnataka. (इरकल شهری तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण नऊवारी वस्त्र/साडी)
  • गोंदण (Gondan): Traditional tattoo. (शरीरावर कायमस्वरूपी नक्षी काढणे)
  • कटाक्ष (Kataksh): A keen, strict watch or a pointed glance; careful attention. (तीक्ष्ण नजर; बारकाईने लक्ष ठेवणे)
  • आपपरभाव (Aapparabhav): Discrimination or partiality; treating some differently from others. (पाहिजे ते, नको ते असा भेदभाव)
  • शहानिशा (Shahanisha): Verification, scrutiny, or thorough investigation to ascertain truth. (सत्यता पडताळून पाहणे)
  • हुकमत गाजवणे (Hukumat Gajavne): To assert authority or to boss around. (अधिकार गाजवणे)
  • नजरेतून उतरणे (Najretun Utarne): To lose respect in someone's eyes; to fall in someone's esteem. (आदर कमी होणे)
  • कानोसा घेणे (Kanosa Ghene): To eavesdrop or try to overhear a private conversation. (दुसऱ्यांचे बोलणे चोरून ऐकणे)
  • द्‌विगुणित (Dvigunit): Doubled or twofold. (दुप्पट)
  • वचक (Vachak): Awe-inspiring authority or control that commands respect and sometimes fear. (धाक, दरारा)
  • हेवेदावे (Hevedaave): Jealousy and rivalry. (मत्सर, द्वेष)
  • सागवानी वासा (Sagvani Vasa): A beam or rafter made of teakwood. (सागाच्या झाडापासून बनवलेला लाकडी दांडा/ओंडका)
  • भरभक्कम (Bharbhakkam): Strong, sturdy, robust, substantial. (मजबूत, टिकाऊ)
  • समर्पकता (Samarpakata): Appropriateness or suitability. (औचित्य, योग्यता)
  • व्युत्पत्ती (Vyutpatti): Etymology; the origin and historical development of a word. (शब्दाची उत्पत्ती किंवा मूळ)
  • खापराच्या भिंगऱ्या (Khaprachya Bhingrya): Spinning tops made from pieces of earthenware or pottery shards. (फुटलेल्या मातीच्या भांड्यांच्या तुकड्यांपासून बनवलेले भवरे)