Advertisement

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती


शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

कृती (१)  कारणे  लिहा.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

कृती (१) | Q 1.1 | Page 77

1) अनूने घर सोडले; कारण ______________

SOLUTION

अनूने घर सोडले; कारण पाच वर्षे तरी तिला स्वत:ची म्हणून जगायची होती.


2) ‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण  ______________

SOLUTION

"जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा,' असे अनू म्हणाली; कारण प्रत्येक वस्तूचे, घटनेचे, व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला तिची स्वतंत्र नजर तयार करायची होती.


3) अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________ 

SOLUTION

अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण तिची कॅलिबर डॉक्टर होण्याची होती.


कृती (१)  आ) खालील नातेसंबंध लिहा.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती


कृती (१) | Q 2.1 | Page 77

1) अनु आणि आबा ___________

SOLUTION

अनू आणि आबा - मुलगी व वडील.


2) भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________

SOLUTION

भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर - प्रवासी व टॅक्सीवाला.


3) अनू आणि सुनीता ___________

SOLUTION

अनू आणि सुनीता - नर्स व रुग्ण.


कृती (२) कृती करा.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती


कृती (२) | Q 1 | Page 77

1) अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी

SOLUTION

(१) तिला लाभली होती तेवढी बुद्धी.

(२)शिक्षण परवडण्याइतका पैसा.

(३)तुफान अभ्यास करण्याची तयारी.


2) आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये

SOLUTION

(१) स्त्री पुरुष समानता पाळणा.

(२) व्यक्तीच्या स्वातंत्र्याची जपणूक करणारे.

(३) प्रत्येक वस्तूचे, व्यक्तीचे, घटनेचे मूल्यमापन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतंत्र नजर हवी, असे मानणारे.


3) अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती

SOLUTION

डॉक्टरचा पेशा

नर्सचा पेशा

(१) डॉक्टर तुलनेने कमी महत्त्वाचा.

(१) नर्स तुलनेने अधिक महत्त्वाची.

(२) डॉक्टर होणे तुलनेने सोपे.

(२) नर्स होणे तुलनेने कठीण.

(३) डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा असतो.

(३) नर्सच्या पेशात मनाचा भाग मोठा असतो.

(४) डॉक्टरचा स्टेथॉस्कोप फक्त छातीपर्यंतच पोहोचतो.

(४) नर्सचा हात काळजाच्या आत जातो.

(५) रोग जाणणे हे डॉक्टरचे कार्य असते.

(५) पेशन्ट समजून घेणे हे नर्सचे कार्य असते.

(६) डॉक्टर रोग्याचा ताप पाहून मोकळे होतात.

(६) नर्स ताप आणि मनस्ताप या दोन्हींचे निवारण करतात.


कृती (४)  थोडक्यात उत्तरे लिहा.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती


कृती (४) | Q 1 | Page 77

1) घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

SOLUTION

अनूच्या मते, माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय लावून घेतात. जन्मल्यापासून आईवडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येकाला स्वतंत्र मेंदू मिळालेला असतो. पण माणसे दुसऱ्याच्या मताने वागतात. यामुळे माणसे स्वतः स्वतंत्र अस्तित्व, जगाकडे पाहण्याची स्वतंत्र नजर गमावून बसतात. अनूला हे अजिबात मान्य नव्हते. तिच्या मते, प्रत्येकाला जगाकडे स्वत:च्या स्वतंत्र नजरेने बघता आले पाहिजे. स्वत:च्या स्वतंत्र नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वत:ची स्वतंत्र नजर घडवायची होती. हे सगळे कमावण्यासाठी तिला पाच वर्षे स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता. त्या अनुभवातून ती नवे काहीतरी घडवू पाहत होती. घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता.


2) अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.

SOLUTION

अनूला स्वत:ला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे होते. तिला समाज समजून घ्यायचा होता. त्यासाठी ती स्वत:च समाजाच्या व्यवहारांत उतरू पाहत होती. हे तिला स्वत:च्या स्वतंत्र बुद्धीने करण्याची संधी हवी होती. आपल्या बुद्धीवर तिला कोणाचाही प्रभाव नको होता, कोणाच्याही विचारांचे प्रतिबिंब नको होते. तिला समाजाचे खरेखुरे रूप जाणून घ्यायचे होते. नोकरी करणे हा समाजात मिसळण्याचा एक मार्ग तिला दिसत होता. नोकरीचा निर्णय घेतल्यावर तिने विचारपूर्वक नर्सचा पेशा स्वीकारला. इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपात भेटतात; जीवनाचे खरेखुरे दर्शन तिथे घडते, माणूस कळतो, असे तिचे मत होते. नर्स रुग्णांच्या भावजीवना पर्यंत पोहोचते. ती त्यांचा ताप व मनस्ताप या दोन्हींचे निवारण करते. म्हणूनच तिच्या मते, समाज समजून घेण्यासाठी नर्सची नोकरी करणे हा योग्य मार्ग होता.


3) कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.

SOLUTION

या कथेतील सर्वच प्रसंग मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत. प्रत्येक प्रसंग उत्सुकता ताणत ताणत वाचकाला पुढे घेऊन जातो. त्यांतल्या पहिल्या प्रसंगात तर उत्कंठा शिगोशीग भरलेली आहे. पहिलेच वाक्य मुळी वाचकांची पकड घेते. कथानिवेदक स्वत:च्या व पत्नीच्या वतीने अनूची शरणागती पत्करून माफी मागावी तशी माफी मागतो. त्याच्या मनाची अत्यंत अगतिक अवस्था त्यातून दिसून येते. येथे वाचकाच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे राहतात. काय केले असेल या दोघांनी? इतकी मिनतवारी करून माफी मागावी, असे काय घडले असेल? या तिघांचे एकमेकांशी नाते तरी कोणते असावे? सुरुवातीला अनू त्या दोघांची मुलगी तर नाही ना, अशी शंका वाचकाला वाटू लागते. तिचे जेवण आटपले होते. पण ती पानावर दिङ्मूढ, स्तंभित अवस्थेत बसली होती. एवढी कोणती मोठी आपत्ती कोसळली असेल? तिचे उद्गार त्या दोघांनाही जिव्हारी लागतात. पुढे थोडे वाचल्यावर अनू त्यांची मुलगी नाहीच, हे लक्षात येते. साधारणपणे त्रयस्थांशी आपण टोकाचे वागत नाही. अशा प्रकारे वाचकाची उत्कंठा सतत टिकवून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य दिसून येते.


4) कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.

SOLUTION

या कथेत पावलापावलावर कलाटणी मिळत जाते. त्या प्रसंगांमधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो संपूर्ण कथेलाच कलाटणी देतो. भर मध्यरात्री कथा निवेदन, मुक्ता व अनू भाड्याने भेटण्यासाठी निघाले. वाचकाला वाटू लागते की आता काय तो सोक्षमोक्ष लागेल. ती नोट भिड्यांकडे असेल, तर मिळेलच. मग सर्व प्रश्न मिटतील आणि टॅक्सीवाल्याकडे असेल, तर शोधच खुंटेल. मात्र घडते ते विलक्षणच. वाचकाच्या कल्पनेतही नसलेले घडते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो. या अपघाताने अकल्पित घटना घडतात. नोट मिळते, टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते निर्माण होते. नोट मिळाल्यामुळे नोटेचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते. अनू त्या मुलीच्या कुटुंबीयांशी मनाने जोडली जाते. अखेरीस हेही स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. त्या एका अपघाताच्या प्रसंगाने कथेला खूप उंचीवर नेऊन ठेवलेले दिसून येते.


कृती (५) तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती


कृती (५) | Q 1 | Page 77

अ) भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.

SOLUTION

भिडे दाम्पत्य हे सरळ, साध्या वृत्तीचे. पूर्णपणे चांगुलपणा असलेले. लपवाछपवी, लबाड्या न करणारे. हातचे राखून न वागणारे. निष्कपट, सच्छील वृत्तीचे. ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीने यायला निघाले. रात्री १२-१२.३० वाजण्याची वेळ. दुर्दैवाने त्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जगणे अशक्य होते. या प्रसंगात टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती. तो आयुष्यातूनच उठला असता. टॅक्सीवाल्याचा सालसपणा, सज्जनपणा भिड्यांना खूप भावला होता. तशात त्या टॅक्सीवाल्याची काडीचीही चूक नव्हती. साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता आणि कोणीही त्याला मदत केली नसती. टॅक्सीवाल्यांकडे तुच्छतेनेच पाहिले जाते. त्यांना क्षुद्र समजले जाते. अशा वातावरणात भिडे दाम्पत्यांची कृती खूपच उठून दिसते. मध्यरात्र उलटून गेलेली होती. मृत्यूसंबंधातील केसमध्ये कोणीही जवळपास जायलाही तयार होत नाहीत. भिडे स्वत:हून तयार झाले. पोलीस स्टेशनला हेलपाटे घालावे लागण्याची शक्यता असते. आपण अकारण अडचणीत येण्याचीही शक्यता असते. तरीही भिडे दाम्पत्याने मनापासून टॅक्सीवाल्याला मदत केली. त्यांच्या साक्षीमुळे तो प्रचंड मोठ्या संकटातून वाचला होता. गरिबांना, सज्जनांना मदत करण्याची भांड्यांची ही वृत्ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते.


आ) टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.

SOLUTION

टॅक्सी ड्रायव्हर हा साधा, सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता. दिवसभर टॅक्सी चालवीत असे. प्रसंगी रात्रीही चालवीत असे. तो नुकताच या पेशात आला होता. दिवसा जेवायला मिळाले नव्हते. मध्यरात्री त्याने उसळपाव खाल्ला. अशा त्याने तो कष्टपूर्वक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होता. आपल्या पेशाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, मानमरातब नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती; म्हणून अपघातात त्याच्या बाजूने साक्ष दयायला आल्याबद्दल त्याला भिड्यांविषयी प्रचंड कृतज्ञता वाटते. जर भिडे साक्ष दयायला गेले नसते, तर तो आयुष्यातून उठला असता. भिड्यांना त्याचा सालसपणा, प्रामाणिकपणा भावला. म्हणून ते स्वत:हून त्याला मदत करायला गेले. अनू स्वत:ची हकिगत सांगत होती. ती ऐकून तो आतून पूर्णपणे हलून गेला. अनू त्या मुलीशी भावनिकदृष्ट्या बांधली गेलेली पाहून त्याला भरून येते. तो अप्रत्यक्ष रितीने तिच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुकच करतो. पण स्वतः पार गलबलून जातो. कारण ती मुलगी त्याची स्वतःची मुलगी होती. अनूशी बोलताना टॅक्सीवाल्याची वैचारिक व भावनिक प्रगल्भता दिसून येते. गरीब कष्टकरी वर्गातला असूनही त्याची प्रगल्भ वैचारिक बैठक लक्षात येते.


कृती (६) स्वमत.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती


कृती (६) | Q 1 | Page 78

अ) कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.

SOLUTION

अनू ही कथेची नायिका आहे. ती चारचौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तर्हेवाईक, विक्षिप्त वाटेल. पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही, आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत यावर ती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो, तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वत:च्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अनू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे. म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो. म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वत:ला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व अनू स्वत:साठी घडवत होती.


आ) एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.

SOLUTION

अनूच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक वेगळाच शोध मला लागला आहे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता, स्वत: स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो. अनू असा दृष्टिकोन फक्त बाळगते असे नाही; तर ती तसे जगायचे ठरवते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते. स्वत:च्या इच्छेने, स्वत:च्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते. सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते. विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुशीत, आनंदात राहते. संपूर्ण हॉस्पिटलचे मन ती जिंकते. थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे जगता येते, हे अनूवरून कळते. हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शोध आहे. माझा पेशा आता मीच ठरवणार.


इ) कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.

SOLUTION

या कथेतील एक रुपयाच्या नोटा चा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती आहे. त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे एक रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री साडेबारा-एक नंतर कथा निवेदन, मुक्ता व अनू बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परिवहन निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडेदांपत्य घरी पोहोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या एक रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनूने सर्व हकिगत सांगितल्यावर एका नऊ-दहा वर्षांच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती, हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनू टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते, म्हणून 'शोध' हे शीर्षक खूप समर्पक शीर्षक आहे.


ई) कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध' तुमच्या शब्दांत लिहा.

SOLUTION

टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी मरण पावली होती. त्या दुःखात तो बुडालेला होता. अनूला नोट मिळाली. त्या टॅक्सीवाल्याच्या मुलीनेच दिलेली ती नोट होती. ती नोट निर्जीव होती म्हणून सापडू शकली. नोटा चा शोध संपला; पण टॅक्सीवाल्याची मुलगी गेलेलीच आहे. ती पुन्हा मिळणे केवळ अशक्य आहे. हातातून निसटलेल्या सर्वच गोष्टी मिळत नाहीत, हे वास्तव टॅक्सीवाल्याला जाणवते आणि तो ते बोलूनही दाखवतो. यातून सुचवायचे आहे की माणसे एका अतर्क्य गोष्टीच्या शोधाला जुंपलेली असतात. सर्वजण काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असतात. आयुष्य म्हणजे एक शोधयात्राच असते. काहीजणांच्या हाती काहीतरी कधीतरी लागते. तर काहीजणांचे हात कायम रिकामेच राहतात. बहुधा सामान्य, निर्जीव, जड वस्तू आपल्या हाती लागते. पण त्या टॅक्सीवाल्याने मुलगी गमावली होती. त्यात टॅक्सीवाल्याचा दोष नव्हता. त्या मुलीचा दोष नव्हता की तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही दोष नव्हता. ती मुलगी कधीच भेटणार नव्हती. आयुष्य हे असेच आहे. अत्युच्च, चिरंतन असे आपल्या हाती कधीच लागत नाही. माणसाला हा शापच आहे.


कृती (७)  अभिव्यक्ती.

शोध स्वाध्याय कृती इयत्ता बारावी | शोध - Shodh साहित्यप्रकार संपूर्ण स्वाध्याय कृती


कृती (७) | Q 1 | Page 78

अ) 'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

SOLUTION

निसर्गाने प्रत्येक माणसाला स्वतंत्र देह दिला आहे. त्याबरोबर स्वतंत्र मेंदूही दिला आहे. आपल्या मनात दोन पावले चालण्याची इच्छा निर्माण झाली की, आपला मेंदू कामाला लागतो. तो पायांना आज्ञा देतो. पाय दोन पावले पुढे सरकतात. याचा साधा अर्थ असा की, आपला मेंदू आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे वागतो. मेंदू आपल्या ताब्यात आहे. आपण सांगू तसे तो काम करणार. पण इथेच खरा मुद्दा आहे. आपण जो विचार करतो, तो विचार आपला स्वत:चा असतो काय? आपण काय करतो? आपला मित्र अमूक एका पद्धतीने वागतो, म्हणून आपण वागतो. शेजारी जे काही करतात, तसे करण्याचा आपण प्रयत्न करतो. कधी रूढीप्रमाणे वागतो, परंपरेप्रमाणे वागतो. म्हणजे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत नाही. आपल्याला मिळालेल्या स्वतंत्र मेंदूचा आपण वापर करीत नाही. स्वतंत्र मेंदू बरोबर जगाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मिळालेली नजर आपण गमावून बसतो. एक प्रकारे आपण बौद्धिक गुलामगिरी स्वीकारतो. स्वत:हून दुसऱ्याचे गुलाम बनतो. हे बदलले पाहिजे. स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे.


आ) कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.

SOLUTION

'शोध' या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे. तो साधा, सरळ मनाचा, सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायिभाव आहे. तो दिवसरात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळपाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला, तरी समजून घेता येईल. पण तो स्वभावाने सालस आहे. हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, मानसन्मान नाही, हे त्याला ठाऊक आहे. म्हणून भिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे.

अनूची हकिगत ऐकल्यानंतर तो ज्या तन्हेने व्यक्त झाला, त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिक दृष्ट्या गुंतत नाही. अनू तशी नाही. अनूचे हे मोठेपण तो ओळखतो. या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळाच असते. म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला आवडली आहे.


Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

Chapter 1.01: वेगवशता

Chapter 1.02: रोज मातीत

Chapter 1.03: आयुष्य... आनंदाचा उत्सव

Chapter 1.04: रे थांब जरा आषाढघना

Chapter 1.05: वीरांना सलामी

Chapter 1.06: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)

Chapter 1.06: रंग मा झा वेगळा

Chapter 2.07: विंचू चावला...

Chapter 2.08: रेशीमबंध

Chapter 2.09: समुद्र कोंडून पडलाय

Chapter 2.1: दंतकथा

Chapter 2.11: आरशातली स्त्री

Chapter 2.12: जयपूर फूटचे जनक

Chapter 2.12: रंगरेषा व्यंगरेषा

Chapter 3: कथा-साहि त्यप्र कार-परिचय

Chapter 3.01: शोध

Chapter 3.02: गढी

Chapter 4.01: मुलाखत

Chapter 4.02: माहि तीपत्रक

Chapter 4.03: अहवाल

Chapter 4.04: वृत्तलेख

Chapter 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार

Chapter 5.02: लेखन : निबंधलेखन

HSC Marathi Question Paper 2020 PDF - Std 12th Science, Commerce & Arts - Maharashtra Board

Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

Author: Balbharati

Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research

Language: Marathi

Also Read: मराठी निबंध यादी

निबंधलेखन Marathi

माझा आवडते मराठी निबंध

प्राण्यावर मराठी निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

खेळावरील मराठी निबंध

ऋतूवरील मराठी निबंध

सणांवर मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

तंत्रज्ञान मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

आत्मकथा मराठी निबंध

वर्णनात्मक निबंध 

महत्वाचे निबंध 

.

PDF FILE TO YOUR EMAIL IMMEDIATELY PURCHASE NOTES & PAPER SOLUTION. @ Rs. 50/- each (GST extra)

SUBJECTS

HINDI ENTIRE PAPER SOLUTION

MARATHI PAPER SOLUTION

SSC MATHS I PAPER SOLUTION

SSC MATHS II PAPER SOLUTION

SSC SCIENCE I PAPER SOLUTION

SSC SCIENCE II PAPER SOLUTION

SSC ENGLISH PAPER SOLUTION

SSC & HSC ENGLISH WRITING SKILL

HSC ACCOUNTS NOTES

HSC OCM NOTES

HSC ECONOMICS NOTES

HSC SECRETARIAL PRACTICE NOTES

2019 Board Paper Solution

HSC ENGLISH SET A 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET B 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET C 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET D 2019 21st February, 2019

SECRETARIAL PRACTICE (S.P) 2019 25th February, 2019

HSC XII PHYSICS 2019 25th February, 2019

CHEMISTRY XII HSC SOLUTION 27th, February, 2019

OCM PAPER SOLUTION 2019 27th, February, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION COMMERCE, 2nd March, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION SCIENCE 2nd, March, 2019

SSC ENGLISH STD 10 5TH MARCH, 2019.

HSC XII ACCOUNTS 2019 6th March, 2019

HSC XII BIOLOGY 2019 6TH March, 2019

HSC XII ECONOMICS 9Th March 2019

SSC Maths I March 2019 Solution 10th Standard11th, March, 2019

SSC MATHS II MARCH 2019 SOLUTION 10TH STD.13th March, 2019

SSC SCIENCE I MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 15th March, 2019.

SSC SCIENCE II MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 18th March, 2019.

SSC SOCIAL SCIENCE I MARCH 2019 SOLUTION20th March, 2019

SSC SOCIAL SCIENCE II MARCH 2019 SOLUTION, 22nd March, 2019

XII CBSE - BOARD - MARCH - 2019 ENGLISH - QP + SOLUTIONS, 2nd March, 2019

HSC Maharashtra Board Papers 2020

(Std 12th English Medium)

HSC ECONOMICS MARCH 2020

HSC OCM MARCH 2020

HSC ACCOUNTS MARCH 2020

HSC S.P. MARCH 2020

HSC ENGLISH MARCH 2020

HSC HINDI MARCH 2020

HSC MARATHI MARCH 2020

HSC MATHS MARCH 2020


SSC Maharashtra Board Papers 2020

(Std 10th English Medium)

English MARCH 2020

HindI MARCH 2020

Hindi (Composite) MARCH 2020

Marathi MARCH 2020

Mathematics (Paper 1) MARCH 2020

Mathematics (Paper 2) MARCH 2020

Sanskrit MARCH 2020

Sanskrit (Composite) MARCH 2020

Science (Paper 1) MARCH 2020

Science (Paper 2)

Geography Model Set 1 2020-2021


MUST REMEMBER THINGS on the day of Exam

Are you prepared? for English Grammar in Board Exam.

Paper Presentation In Board Exam

How to Score Good Marks in SSC Board Exams

Tips To Score More Than 90% Marks In 12th Board Exam

How to write English exams?

How to prepare for board exam when less time is left

How to memorise what you learn for board exam

No. 1 Simple Hack, you can try out, in preparing for Board Exam

How to Study for CBSE Class 10 Board Exams Subject Wise Tips?

JEE Main 2020 Registration Process – Exam Pattern & Important Dates


NEET UG 2020 Registration Process Exam Pattern & Important Dates

How can One Prepare for two Competitive Exams at the same time?

8 Proven Tips to Handle Anxiety before Exams!

BUY FROM PLAY STORE

DOWNLOAD OUR APP

HOW TO PURCHASE OUR NOTES?

S.P. Important Questions For Board Exam 2022

O.C.M. Important Questions for Board Exam. 2022

Economics Important Questions for Board Exam 2022

Chemistry Important Question Bank for board exam 2022

Physics – Section I- Important Question Bank for Maharashtra Board HSC Examination

Physics – Section II – Science- Important Question Bank for Maharashtra Board HSC 2022 Examination

Important-formulaTHANKS