Advertisement

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita 

कृती (१) खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.   

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (१) | Q 1.1 | Page 41
1) उंचच उंच पण अरुंद बालपण-
SOLUTION

किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहतो. त्याच्या मनात विचार येतो की, शहर उंचच उंच इमारतींनी नटलेय; पण त्यांत बालकांचे बालपण मात्र खुजे झालेय. माती त्याच्यापासून दुरावलेली आहे. त्यामुळे त्याचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद झालेले आहे. 

2) डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ-
SOLUTION
समुद्र जेव्हा उत्तुंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका निरागस बालकाला पाहतो, तेव्हा त्याला बालकाच्या बालपणाची खंत वाटते. त्याचे बालपण खुजे होत चाललेय, याची मनस्वी काळजी वाटते. त्रासून तो हताशपणे बालकाकडे पाहतो नि समुद्राच्या डोळ्यांत आभाळभर थकवा उतरतो.

3) स्टेशनवरल्या बाकाएवढं मुलाचं बालपण-
SOLUTION
महानगरीय जीवनाची झालेली घुसमट पाहून समुद्र संत्रस्त होऊन शहरातून हिंडतो व थकून स्टेशनवरच्या बाकड्यावर बसतो. तेव्हा त्याला शेजारी एक मूल पाय पोटाशी दुमडून झोपलेले आढळते. त्याच्या मनात विचार येतो की, या शहराच्या रहदारीत या बालकाचे बालपण हरवले तर आहेच, पण ते खुंटत चालले आहे. बालपणीचा त्यांचा आनंद आक्रसला आहे. जणू त्याचे बालपण हे स्टेशनवरल्या बाकड्यापुरतेच मर्यादित व बंदिस्त झाले आहे.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (१)  Q.2) कारणे लिहा.

कृती (१) | Q 2.1 | Page 41
1) कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण
SOLUTION
कवीला समुद्र संत्रस्त वाटतो; कारण समुद्र गगनचुंबी इमारतीच्या गजांआड कोंडून पडलाय.

2) समुद्र अस्वस्थ होतो, कारण...
SOLUTION
समुद्र अस्वस्थ होतो; कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो.

3) समुद्र शिणून जातो, कारण...
SOLUTION
 समुद्र शिणून जातो; कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची खूप काळजी वाटते.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (2) तक्ता पूर्ण करा.

कृती (२) | Q 1 | Page 41
कवितेचा विषयकवितेची मध्यवर्ती कल्पनामनाला भिडणारे शब्दसमूह
   
SOLUTION

कवितेचा विषय

कवितेची मध्यवर्ती कल्पना

मनाला भिडणारे शब्दसमूह

आक्रसून गेलेल्या महानगरीय जीवनाची शोकांतिका

समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे. महानगरीय जीवनाची घुसमट आणि माणसांची होत असलेली नगण्य अवस्था पाहून समुद्र चिंताग्रस्त झालेला आहे.

(१) समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचे आभाळ उतरते
(२) मुलाचे बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढे


समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (2)  चौकटी पूर्ण करा.

कृती (२) | Q 2 | Page 41

SOLUTION

(१) पिंजारलेले दाढी व झिंज्या.
(२) शहरातल्या रस्त्यावरून व वस्त्यांमध्ये हिंडतो.
(३) हातावर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतो.
(४) समुद्र खिन्न हसतो.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (३)   खालील ओळींचा अर्थ लिहा.

कृती (३) | Q 1 | Page 41
1) समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
SOLUTION
ओळींचा अर्थ : माणुसकीहीन झालेल्या शहरी जीवनाचा विचार करून समुद्र बेचैन होतो. मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या रस्त्यांवरून विमनस्कपणे हिंडतो, वस्त्यांमधून पायपीट करतो आणि अखेर उशिरा रात्रीपर्यंत स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर बसतो. समोरच्या गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो. हातांवर डोके ठेवून हतबल होऊन अर्धमिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय ह्रास पाहत राहतो.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (४) काव्यसौंदर्य.

कृती (४) | Q 1 | Page 41
1) ‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
SOLUTION
'समुद्र कोंडून पडलाय' या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी महानगरीय जीवनातील फोलपणा अधोरेखित करताना उपरोक्त ओळी लिहिलेल्या आहेत.
महानगरीय घुसमट व्यक्त करताना कवी समुद्राचे रूपक वापरतात. समुद्र म्हणजे अफाट जीवन! ते आजमितीला शहरातील उत्तुंग इमारतीच्या गजांआड कोंडून पडले आहे. या विचारांनी अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर हताश होऊन बसतो. त्या वेळी त्याच्याच शेजारी त्याच बाकड्यावर एक मूल पाय छातीशी दुमडून झोपलेले त्याला आढळते. त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुरटलेले बालपण त्या बाकाएवढेच संकुचित असलेले जाणवते. पण झोपी गेलेल्या मुलाला या भयानक वास्तवाची कल्पना असावी की नसावी, ही शंकाही समुद्राच्या मनात डोकावते.
भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगराच्या भगभगीत संस्कृती उजाड व सिमित झाले आहे, हा विचार हृदय हेलावून टाकणाऱ्या शब्दांत कवीने सशक्तपणे मांडला आहे.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

2) 'समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.'
या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
SOLUTION
महानगरीय दुरवस्था नि घुसमट 'समुद्र कोंडून पडलाय' या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी भावपूर्ण शब्दांत चित्रित केली आहे. मूल्यहीन शहरी संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेला समुद्र अपरात्री थेकूनभागून रेल्वे-फलाटावरील एकाकी बाकड्यावर विसावतो. तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पाण्याची मोटकुळी करून झोपलेले त्याला दिसते. बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषादाने उदास होऊन हसतो. जळजळणाऱ्या डोळ्यांवर दमलेल्या पापण्या मिटून घेतो. वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते. उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो.
स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दांत रेखाटली आहे. भविष्यकालीन निर्मळ जीवन शहरी संस्कृती मुकणार आहे, तिचा भावनिक ऱ्हास डोळ्यांदेखत पाहतानाची वेदना कवीने मूर्त केली.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (५)  रसग्रहण.

कृती (५) | Q 1 | Page 42

1) प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.
1) समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.

SOLUTION
आशयसौंदर्य : 'समुद्र कोंडून पडलाय' या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी 'समुद्र' हे अथांग जीवनाचे रूपक घेऊन महानगरी जीवनाची मूल्यहीनता आणि संवेदनशीलता प्रकर्षाने दाहक शब्दांत मांडली आहे. या संदर्भात उपरोक्त ओळीत समुद्राची असाहाय्य हतबलता अधोरेखित केली आहे.

काव्यसौंदर्य : किनाऱ्यावरील टोलेजंग, उत्तुंग इमारतीच्या गजांआड समुद्र म्हणजे पर्यायाने निर्मळ अथांग जीवन कैद झालेले आहे. संध्याकाळच्या वेळी अतिशय त्रासलेला समुद्र दाढी व झिंजा पिंजारून हताश झाला आहे. त्याला गगनचुंबी इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर एक मुलगा दिसतो. त्या मुलाचा विचार करताना समुद्राला हे जाणवते की मुलाचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद म्हणजे खुजे झालेले आहे, याची त्या बालकाला कल्पनाच नाही. भौतिक प्रगतीची उंची आणि खुजी झालेली बाल्यावस्था यातील विरोधाभास समुद्राच्या लक्षात येतो. त्याच्या डोळ्यांत अफाट थकवा येतो. म्हणून तो नजर वळवून इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावरचे माणसांचे रखडत चाललेय पाय व सुसाट पळणारी बसची चाक पाहतो. तिथेही त्याला गती-अधोगतीचे विचित्र चित्र दिसते.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत कवीने मुक्तच्छंद योजिला आहे. कवीने मुक्तशैलीतील विधानात्मक मांडणी करून महानगरीय वैफल्यग्रस्तता शब्दांतून दर्शवली आहे. त्यामुळे गिरमिटाने ऊर्ध्वमूल पोखरण जावे, तशी शब्दकळा हृदयाला थेट भिडते व व्याकूळ अनुभवांची प्रचिती येते. समुद्र चलत व गतिमान क्रियापदांमुळे समुद्राचा मानसिक प्रवास दृग्गोचर होतो. 'पिंजारलेले केस व दाढी' या शब्दबंधातून समुद्राचे मानवीकरण करून भावनिक पातळीत कविता जाताना दिसते. 'उंचच उंच व अरुंद बालपण', 'डोळ्यांत थकव्याचं आभाळ' या प्रत्ययकारी प्रतिमांतून आशयाचा विस्तार अधिक गडद झाला आहे. महानगरीय संवेदनेची ही मराठी कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita

कृती (६) अभिव्यक्ती.

कृती (६) | Q 1 | Page 42
1)‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
SOLUTION
मी समुद्र बोलतोय. आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय. पूर्वी 'समुद्र अथांग आहे, असीम आहे.' अशी वाक्ये माझ्या कानावर पडायची, तेव्हा मला अफाट आनंद होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'सागरा प्राण तळमळला' अशी जेव्हा मला साद घातली, तेव्हा माझा ऊर भरून आला; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती. कुसुमाग्रज यांनी तर 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत "हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे डळमळू दे तारे, कथा या खुळ्या सागराला/ अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला" असे आव्हान दिले, तेव्हा माणसाच्या ध्येयासक्तीला किनारा नाही, याचा मलाही अभिमान वाटला. पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा! पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट, मैलोनमैल पसरलेली धरती न्याहाळायचो. त्या धरणीमायची साथ मला असायची. तिच्या कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून आतुरतेने तळमळायचो.

पण याच माझ्या किनाऱ्यावर आज मानवाने उत्तुंग, टोलेजंग, उंचच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे. आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला; पण जमिनीवरचे पाय विसरला. प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेताना मायेचा पदर त्याला पारखा झाला. लौकिक सुखाच्या हव्यासापोटी त्याने चंगळवादी संस्कृतीला जन्म दिला. प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला.
पंचमहाभूतांपैकी मी एक 'भूत' तुम्हांला सांगत आहे. तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत, तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल नि मग प्राण दयायला माझ्याकडे याल, तेव्हा माझी माया आटलेली असेल!
अभिव्यक्ती.

2) शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.
SOLUTION
'समुद्र कोंडून पडलाय' या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयाण वास्तव भावपूर्ण शब्दांत ग्रथित केले आहे.
किनाऱ्यावरील उभारलेल्या उंचचउंच गगनभेदी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही, ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे. 
दुसरीकडे एक, दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपले आहे. एक गगनचुंबी इमारतीत दुसरे अनिकेत जमिनीवर हा विरोधाभास वेदनामय आहे. दोघांचेही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजेच पर्यायाने निकोप जीवनाला येणे, हे दुःखमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत बसतो. दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तीमधून सैरभैर हिंडत राहतो.अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवींनी समर्थपणे चितारली आहे.

3) ‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा.
SOLUTION
समुद्र म्हणजे अमर्याद असलेले प्रवाही मानवी जीवन होय !समुद्रासारखे सर्जनशील अथांग जीवन जेव्हा महानगरांच्या मर्यादेत बंदिस्त होते, त्या वेळची बेचैन अवस्था, जीवघेणी घुसमट "समुद्र कोंडून पडलाय' या कवितेच्या शीर्षकातून कवी वसंत आबाजी डहाके यांनी सार्थपणे प्रत्ययास आणली आहे.
शहरांमध्ये उंचचउंच टोलेजंग इमारतीचे तुरुंग उभारले गेले आहेत. त्यात बाल्यावस्था घुसमटते आहे. या उत्तुंग इमारतींच्या गजांआड समुद्र असाहाय्य होऊन अडकला आहे. समुद्राचे अस्तित्व हे विस्तीर्ण, अफाट व विशाल असते. ते सतत उचंबळलेले व जिवंत असते; परंतु भौतिक सुखाच्या हव्यासाने येणाऱ्या महानगरीय चंगळवादाने या विशाल जीवनाला कैद केले आहे. जणू संजीवन पाण्याची कबर बांधली आहे किंवा अमृताचे विषात रूपांतर झाले आहे. समुद्राची ही भावविवशता कवींनी 'समुद्र कोंडून पडलाय' या शीर्षकामधून प्रत्ययकारकरीत्या साकारली आहे. त्यामुळे हे शीर्षक या कवितेला अगदी सूचक व सार्थ आहे

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita 

समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे 

पाय, बसचीं चाकं.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,

हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी.
समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita 

अनुक्रमणिका  / INDIEX

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

Chapter 1.01: वेगवशता

Chapter 1.02: रोज मातीत

Chapter 1.03: आयुष्य... आनंदाचा उत्सव

Chapter 1.04: रे थांब जरा आषाढघना

Chapter 1.05: वीरांना सलामी

Chapter 1.06: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)

Chapter 1.06: रंग मा झा वेगळा

Chapter 2.07: विंचू चावला...

Chapter 2.08: रेशीमबंध

Chapter 2.09: समुद्र कोंडून पडलाय

Chapter 2.1: दंतकथा

Chapter 2.11: आरशातली स्त्री

Chapter 2.12: जयपूर फूटचे जनक

Chapter 2.12: रंगरेषा व्यंगरेषा

Chapter 3: कथा-साहि त्यप्र कार-परिचय

Chapter 3.01: शोध

Chapter 3.02: गढी

Chapter 4.01: मुलाखत

Chapter 4.02: माहि तीपत्रक

Chapter 4.03: अहवाल

Chapter 4.04: वृत्तलेख

Chapter 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार

Chapter 5.02: लेखन : निबंधलेखन

HSC Marathi Question Paper 2020 PDF - Std 12th Science, Commerce & Arts - Maharashtra Board

Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

Author: Balbharati

Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research

Language: Marathi

Also Read: मराठी निबंध यादी

निबंधलेखन Marathi

माझा आवडते मराठी निबंध

प्राण्यावर मराठी निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

खेळावरील मराठी निबंध

ऋतूवरील मराठी निबंध

सणांवर मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

तंत्रज्ञान मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

आत्मकथा मराठी निबंध

वर्णनात्मक निबंध 

महत्वाचे निबंध 

.

PDF FILE TO YOUR EMAIL IMMEDIATELY PURCHASE NOTES & PAPER SOLUTION. @ Rs. 50/- each (GST extra)

SUBJECTS

HINDI ENTIRE PAPER SOLUTION

MARATHI PAPER SOLUTION

SSC MATHS I PAPER SOLUTION

SSC MATHS II PAPER SOLUTION

SSC SCIENCE I PAPER SOLUTION

SSC SCIENCE II PAPER SOLUTION

SSC ENGLISH PAPER SOLUTION

SSC & HSC ENGLISH WRITING SKILL

HSC ACCOUNTS NOTES

HSC OCM NOTES

HSC ECONOMICS NOTES

HSC SECRETARIAL PRACTICE NOTES

2019 Board Paper Solution

HSC ENGLISH SET A 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET B 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET C 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET D 2019 21st February, 2019

SECRETARIAL PRACTICE (S.P) 2019 25th February, 2019

HSC XII PHYSICS 2019 25th February, 2019

CHEMISTRY XII HSC SOLUTION 27th, February, 2019

OCM PAPER SOLUTION 2019 27th, February, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION COMMERCE, 2nd March, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION SCIENCE 2nd, March, 2019

SSC ENGLISH STD 10 5TH MARCH, 2019.

HSC XII ACCOUNTS 2019 6th March, 2019

HSC XII BIOLOGY 2019 6TH March, 2019

HSC XII ECONOMICS 9Th March 2019

SSC Maths I March 2019 Solution 10th Standard11th, March, 2019

SSC MATHS II MARCH 2019 SOLUTION 10TH STD.13th March, 2019

SSC SCIENCE I MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 15th March, 2019.

SSC SCIENCE II MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 18th March, 2019.

SSC SOCIAL SCIENCE I MARCH 2019 SOLUTION20th March, 2019

SSC SOCIAL SCIENCE II MARCH 2019 SOLUTION, 22nd March, 2019

XII CBSE - BOARD - MARCH - 2019 ENGLISH - QP + SOLUTIONS, 2nd March, 2019

HSC Maharashtra Board Papers 2020

(Std 12th English Medium)

HSC ECONOMICS MARCH 2020

HSC OCM MARCH 2020

HSC ACCOUNTS MARCH 2020

HSC S.P. MARCH 2020

HSC ENGLISH MARCH 2020

HSC HINDI MARCH 2020

HSC MARATHI MARCH 2020

HSC MATHS MARCH 2020


SSC Maharashtra Board Papers 2020

(Std 10th English Medium)

English MARCH 2020

HindI MARCH 2020

Hindi (Composite) MARCH 2020

Marathi MARCH 2020

Mathematics (Paper 1) MARCH 2020

Mathematics (Paper 2) MARCH 2020

Sanskrit MARCH 2020

Sanskrit (Composite) MARCH 2020

Science (Paper 1) MARCH 2020

Science (Paper 2)

Geography Model Set 1 2020-2021


MUST REMEMBER THINGS on the day of Exam

Are you prepared? for English Grammar in Board Exam.

Paper Presentation In Board Exam

How to Score Good Marks in SSC Board Exams

Tips To Score More Than 90% Marks In 12th Board Exam

How to write English exams?

How to prepare for board exam when less time is left

How to memorise what you learn for board exam

No. 1 Simple Hack, you can try out, in preparing for Board Exam

How to Study for CBSE Class 10 Board Exams Subject Wise Tips?

JEE Main 2020 Registration Process – Exam Pattern & Important Dates


NEET UG 2020 Registration Process Exam Pattern & Important Dates

How can One Prepare for two Competitive Exams at the same time?

8 Proven Tips to Handle Anxiety before Exams!

BUY FROM PLAY STORE

DOWNLOAD OUR APP

HOW TO PURCHASE OUR NOTES?

S.P. Important Questions For Board Exam 2022

O.C.M. Important Questions for Board Exam. 2022

Economics Important Questions for Board Exam 2022

Chemistry Important Question Bank for board exam 2022

Physics – Section I- Important Question Bank for Maharashtra Board HSC Examination

Physics – Section II – Science- Important Question Bank for Maharashtra Board HSC 2022 Examination

Important-formulaTHANKS