Advertisement

Chapter 4 - झाडांच्या मनात जाऊ Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1 - झाडांच्या मनात जाऊ Balbharati solutions for Marathi

Chapter 1 - झाडांच्या मनात जाऊ Balbharati solutions for Marathi

Chapter 1 - झाडांच्या मनात जाऊ Balbharati solutions for Marathi


Chapter 1: झाडांच्या मनात जाऊ


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

पोपटी स्पंदनासाठी म्हणजे-

OPTIONS

  • पोपटी पानात जाण्यासाठी

  • उत्साहाने सळसळण्यासाठ

  • पानांचे विचार घेण्यासाठी



जन्माला अत्तर घालत म्हणजे-

OPTIONS

  • दुसऱ्याला आनंद देत

  • दुसऱ्याला उत्साही करत

  • स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद दे



तो फाया कानी ठेवू म्हणजे-

OPTIONS

  • सुगंधी वृत्ती जोपासू

  • अत्तराचा स्प्रे मारू

  • कानात अत्तर ठेव



भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-

OPTIONS

  • दारांना तोरणाने सजवू

  • दाराला हलतेझुलते तोरण लाव

  • निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.



मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे-

OPTIONS

  • निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन

  • झाड होऊन फांद्या पसरीन

  • झाड होऊन सावली देईन





खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती

सूचित होणारा अर्थ

(१) कोकीळ होऊनी गाऊ...

 

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...

 



SOLUTION

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती

सूचित होणारा अर्थ

(१) कोकीळ होऊनी गाऊ...

तुमच्या कंठातून निसर्गाचे गाणे फुटूदे.

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...

निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा.



पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा

झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.


SOLUTION

निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची कवींची मनोमन इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात की आपण झाडाच्या मनात शिरू आणि पाने जी विचार करतात, तसे आपणच पानांचे विचार होऊ. म्हणजे आपण स्वत:च झाड होऊ.



हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.


SOLUTION

कवी म्हणतात की माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंदकळते, तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे.



खालील तक्ता पूर्णकरा.

कवितेचा विषय

कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव

कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके

भाषिक सौंदर्यस्थळ

कवितेतून मिळणारा संदेश

 

 

 

 

 



SOLUTION

कवितेचा विषय

कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव

कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके

भाषिक सौंदर्यस्थळ

कवितेतून मिळणारा संदेश

निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे.

निसर्गाशी एकरूपता.

(१) भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा थवा म्हणजे रंगीत पताकांचे तोरण.

(२) सावलीला पंख फुटून तिचे कावळे झाले.

(१) फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी (२) उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी

निसर्गातील बहरलेल्या सौंदर्याचा खुल्या मनाने आनंद लुटणे व आपणच निसर्गाचा घटक होऊन निसर्गाशी एकरूप होणे.





'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ दे...'  या काव्यपंक्तीतील स्पष्ट


SOLUTION

मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील आस्वाद घेण्यासाठी रसिकांना आवाहन केले आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो. झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. वसंत ऋतूची चाहूल आधी कोकीळ पक्ष्याला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू कवी म्हणतात की, वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानांमधील पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील, तर स्वत: कोकीळ पक्षी होऊन हवे. कोकीळ पक्ष्यांच्या स्वरांतून एकरूप होण्याची उत्कट व अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे.



ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारा आशय कवितेच्या आधारे लिहा.


SOLUTION

कवी नलेश पाटील यांनी 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमधून वसंत ऋतूतील निसर्गसौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळेतून साकारले आहे. स्वत: निसर्गाचे घटक होऊन निसर्गसौंदर्याचा कसा आस्वाद घ्यावा, हे सांगताना कवींनी वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली आहेत. बहरलेल्या झाडाचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानांतून झाडाखाली झिरपतात त्या वेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीलाच जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमंतात उडताना दिसतात. - 'ऊन-सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ' या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतनगुणोक्ती अलंकाराचा लोभसवाणा आविष्कार मनाला प्रसन्न करतो.



‘डोळ्यांत झऱ्याचेपाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.


SOLUTION

'झाडाच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी वसंत ऋतूत फुललेल्या निसर्ग घटकाचे लोभसवाणे दर्शन नितांत सुंदर प्रतिमांमध्ये उलगडून दाखवला आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात. वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याची वैभव अनुभवताना कवींना या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टि न्हाऊन निघालेले आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराची किमया असावी, असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभवती आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वत:ची गाणी आहेत. ही सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवींच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की, या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यांत तरळलेले पाणी वेगळे नाही. ते एकच आहे. या झर्यातलेच पाणी माझ्या डोळ्यांत तरळले आहे, अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे. "डोळ्यांत झऱ्याचे पाणी' या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार केली आहे. मानव हा निसर्गाचाच अपत्य आहे, याचे प्रत्यंतर या प्रतिमेतून दिसून येते.



 'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.


SOLUTION

माझे झाडांवर नितांत प्रेम आहे. मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी पोहोचलो. त्यांना विचारले की, तुम्ही सतत माती खाली असता. वरती दिसत नाहीत. तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे म्हणाली – "मातीतच आमचा निवास! आम्ही खाली खोलवर जातो. जीवनरस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांदया झुलतात, पाने डुलतात नि फुले फुलतात. आम्ही जरी मातीत असलो तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो. मातीतला गंध आम्ही फुले ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले आहे. सर्व ऋतूंत आमचे फुलणे, कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे. त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत." झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले नि मनोगताला शीर्षक दिले - 'मुळांची मुले!'



निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.


SOLUTION

 मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोसले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो. डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु-पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी नि:स्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतज्ञ राहिले आहे.



'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेचे रसग्रहण करा.


SOLUTION

'झाडांच्या मनात जाऊ' ही कवी नलेश पाटील यांची कविता 'हिरवं भान' या कविता संग्रहातील घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे. झाडांच्या मनात शिरून त्याचे हृदगत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे, याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दुग्गोचर केले आहे. फुल पाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यांत झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ' अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. 'ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक' ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे.

निसर्ग चित्र रेखाटतांना अम्लान शब्द कळे तून उमटलेला उत्कट भाव - रसिकांना मोहन टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्हसित प्रतिमांतून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुरी या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली.


.

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.