Advertisement

Chapter 1 - मामू Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1: मामू

Chapter 1 - मामू Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board





Chapter 1: मामू

कोण ते लिहा.

चैतन्याचे छोटे कोंब :


SOLUTION

शाळेतील लहान मुले



सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:


SOLUTION

मामू



शाळेबाहेरचा बहुरूपी:


SOLUTION

मामू



अनघड, कोवळे कंठ :


SOLUTION

शाळेतील लहान मुले.

कृती करा.

लेखकाने विदयार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह :


SOLUTION

१) चैतन्याचे छोटे कोंब

२) अनघड, कोवळे कंठ

३) रांगा धरून उभे राहिलेले

४) भावपूर्ण सुरांत प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवणारे


मामुची शाळाबाह्य रूपे :


SOLUTION

१) मौलवी

२) व्यापारी

३) उस्ताद


खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ___________



SOLUTION

मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. देशभक्ती



आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ___________


SOLUTION

आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. मातृप्रेम/भावणाशीलता



मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ ___________


SOLUTION

मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ वात्सल्य



माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत

मामू चहाची ऑर्डर देतो." ____________


SOLUTION

माझ्या कडे कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत

मामू चहाची ऑर्डर देतो." हुशारी



मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो.  ____________


SOLUTION

मामूएखादयाकार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो.  अभ्यासू वृत्ती



खलील शब्द समूहाचा अर्थ लिहा.

थोराड घंटा


SOLUTION

थोराड घंटा-  दणकट, मोठी व वजनदार घंटा.



अभिमानाची झालर


SOLUTION

अभिमानाची झालर - झालरीमुळे शोभा येते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता.  त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे.


पुढील शब्दांतील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

इशारती बरहुकूम


SOLUTION

तीर, इशारती, रती, हुकुम, मर, बशा, बहु



आमदार साहेब


SOLUTION

आमदार , साहेब, आब, दार, दाब, सार, दाम, मदार, मर



पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहन वाक्यात उपयोग करा :

चौवाटा पांगणे


SOLUTION

चौवाटा पांगणे-चहूबांजूना (चारी वाटांवर) विखुरणे, सर्वत्र पांगणे.

वाक्य : गावात दुष्काळ पडला नि गावकरी चौवाटा पांगले.


कंठ दाटून येणे


SOLUTION

कंठ दाटून येणे-गहिवरणे.

वाक्य : मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईंचा कंठ दाटून आला.



हरवलेला काळ मुठीत पकडणे.


SOLUTION

हरवलेला काळ मुठीत पकडणे- भूतकाळातील आठवणी जागृत होणे.

वाक्य : कैक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला.



करील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.

(१) अनुमती

(२) जुनापुराणा

(३) साथीदार

(४) घटकाभर

(५) भरदिवसा

(६) ओबडधोबड

(७) नानतह्रा

(८) गुणवान

(९) अगणित

(१०) अभिवाचन


SOLUTION

उपसर्गघटित

प्रत्ययघटित

अभ्यस्त

अनुमती

घटकाभर

जुनापुराणा

अभिवाचन

गुणवान

ओबडधोबड

भरदिवसा

साथीदार

नानातऱ्हा

अगणित

 

 



स्वमत.

'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


SOLUTION

शाळेत एक शिपाई म्हणून मामू नोकरी करत होता. तो कष्टमय जीवन जगणारा एक कर्मचारी होता. अशा माणसाचे आयुष्य सामान्य पातळीवरच राहते. पण मामूचे मात्र तसे नव्हते. अनेकांना अनेक बाबतीत तो तत्परतेने मदत करायला जाई. यामुळे त्याला अनेक गोष्टींचे आपोआपच ज्ञान होत गेले.

लोकांना मदत करावी, ही त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस, ती चालवायला मदत कर, कोणाच्या मुलांना उर्दू शिकवायला जा. आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. कोणाला काही दुखले-खुपले तर तो आवर्जून औषधोपचार करी. लोकांना 'आत्मीयतेने आरोग्यविषयक सल्ला देई. अशी समोर येतील ती कामे मामू करीत गेला. मनापासून करीत गेला. आपल्याला हे येणारच या आत्मविश्वासाने करीत गेला. त्यातून अनेक कौशल्ये वाढत गेली. तो हरहुन्नरी बनला. जणू तो बहुरूपीच होता. तो नीतीने वागणारा होता. त्याला लोकांविषयी कळकळ वाटत असे. कोणालाही तो तत्परतेने मदत करी. या सगळ्या गुणांमुळे समाजात त्याला खूप मान होता. आमदार, खासदार, बड़े व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशा वरच्या थरांतल्या लोकांशी त्याचे आपलकीचे नाते निर्माण झाले होते. त्या लोकांमध्ये त्याला मानाचे स्थान होते. अगदी सामान्यांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वत्र सामावून गेला होता म्हणून लेखकांनी त्याला बहुरूपी म्हटले आहे.

 

मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.


SOLUTION

मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता, मात्र त्याचे मन संवेदनशील होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता. मामूला पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंड्यांतून, काट्याकुट्यांतून, जंगलातून वाट काढत जायचे होते. बरे, महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे रमत-गमत जाणे शक्यच नव्हते. अशा या खडतर वाटेने चौदा मैलांची पायपीट केल्यावर त्याचे शरीर दमले होते. पण त्याची याबद्दल जराही तक्रार नव्हती. त्याचे मन मात्र ताजे, टवटवीत होते. तो निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत तिथे पोहोचला होता. आताही इतक्या वर्षांनंतर त्या प्रसंगाची आठवण काढताना त्याच्या तोंडून उद्गार येतात, "फाटेचं धुक्यातलं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचे." मामाची ही संवेदनशीलता होय.

दुसरा प्रसंग म्हणजे मामूच्या मुलाच्या लग्नाचा प्रसंग. मामच्या चतुरस व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याचे अनेकांशी आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. म्हणून या लग्नाला समाजातील अनेक मोठमोठी माणसे आली होती. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक असे वेगवेगळ्या थरांतले लोक आत्मीयतेने जमले होते. ते पाहन त्याचे मन भरून आले. आपल्यासारख्या सामान्य, गरीब माणसाविषयी लोकांना खूप आत्मीयता आहे, हे पाहून त्याचा कंठ दाटून आला. सर्वांचे आभार मानताना त्याच्या कंठातून शब्दच फुटेनात. कसेबसे आभार मानून त्याने माईक खाली ठेवला. या दोन्ही प्रसंगांतून मामूच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते.



मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.


SOLUTION

मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता, मात्र त्याचे मन संवेदनशील होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता. मामूला पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंड्यांतून, काट्याकुट्यांतून, जंगलातून वाट काढत जायचे होते. बरे, महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे रमत-गमत जाणे शक्यच नव्हते. अशा या खडतर वाटेने चौदा मैलांची पायपीट केल्यावर त्याचे शरीर दमले होते. पण त्याची याबद्दल जराही तक्रार नव्हती. त्याचे मन मात्र ताजे, टवटवीत होते. तो निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत तिथे पोहोचला होता. आताही इतक्या वर्षांनंतर त्या प्रसंगाची आठवण काढताना त्याच्या तोंडून उद्गार येतात, "फाटेचं धुक्यातलं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचे." मामाची ही संवेदनशीलता होय.

दुसरा प्रसंग म्हणजे मामूच्या मुलाच्या लग्नाचा प्रसंग. मामच्या चतुरस व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याचे अनेकांशी आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. म्हणून या लग्नाला समाजातील अनेक मोठमोठी माणसे आली होती. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक असे वेगवेगळ्या थरांतले लोक आत्मीयतेने जमले होते. ते पाहन त्याचे मन भरून आले. आपल्यासारख्या सामान्य, गरीब माणसाविषयी लोकांना खूप आत्मीयता आहे, हे पाहून त्याचा कंठ दाटून आला. सर्वांचे आभार मानताना त्याच्या कंठातून शब्दच फुटेनात. कसेबसे आभार मानून त्याने माईक खाली ठेवला. या दोन्ही प्रसंगांतून मामूच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते.


अभिव्यक्ती

'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा


SOLUTION

'मामू' या पाठातील मामूचे व्यक्तिचित्रण अत्यंत प्रभावी व परिणामकारक झाले आहे. या पाठातील मामू वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो; याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लेखकाची चित्रदर्शी शैली. "दगडी खांबाला रेलून आपली चुना वाणाची सफेद दाढ़ी कुरवाळत मामू ती समूह प्रार्थना ऐकत राहतो." "खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो." "डोळे किलकिले करीत, भुवया आक्रसू तो बोलतो." या अशा मोजक्या तपशिलांतून मामूच्या हालचाली, त्याचे हावभाव, चेहऱ्यावर तरळणाऱ्या भावभावना प्रत्ययकारक रितीने चित्रित होतात.

याच वर्णनाला उपमा-रूपकांची सुंदर जोड मिळते आणि मामूचे व्यक्तिमत्त्व वाचकांच्या डोळ्यांसमोर साकार होते. उदाहरणार्थ, "चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात."

काही वेळा खूप कमी शब्दांमध्ये लेखक व्यापक आशय व्यक्त करतात. उदाहरणार्थ, एखादयाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याला दुकान चालवायला मदत करणे आणि कोणाच्यातरी मुला-मुलीला उर्दू शिकवणे या दोन कृती च्या साहाय्याने लेखक मामूच्या नाना तऱ्हा उदयोगांचे वर्णन करतात.

सगळ्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे या पाठात लेखकांनी बोलीभाषेचा अत्यंत समर्पक उपयोग केलेला आहे. मामूच्या तोंडी पूर्णपणे बोलीभाषा दिलेली असल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, सरळपणा, प्रामाणिकपणा, त्याच्या मनाचा निर्मळपणा लेखक सहजपणे प्रकट करतात. पण फक्त त्याच्या तोंडीच बोलीभाषा योजलेली आहे, असे नाही, तर लेखकाच्या निवेदनामध्येही बोलीमधील शब्दरूपे विपुलतेने आढळतात. उदाहरणार्थ, सारं, कुणाकडं, इथलं, डुई, कवळिकीच्या वैर, यामुळे पाठामधील सर्व निवेदन मामूच्या व्यक्तिमत्त्वाच्या खूप जवळ जाणारे बनते.



मामूच्या व्यक्तिमत्त्वातले तुम्हाला जाणवलेले गुण स्पष्ट करा.


SOLUTION

मामू हा खूप भावनाशील होता. तो निवृत्त व्हायला आलेला होता. त्याला नातवंडे होती. या वयातही आई गेल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो आईच्या आठवणींनी व्याकूळ झाला.

राजाराम महाराजांचा पन्हाळगडावर मुक्काम असताना मामूला तिथे जावे लागले. त्या काळात वाहनांची सोय असणे अशक्य होते. दगडधोंड्यांतून, जंगलातून पायपीट करीत त्याला चौदा मैल जावे लागले. या प्रवासाचा त्याला खूप त्रास झाला. पण तो इतका संवेदनशील होता की, या शारीरिक कष्टांची जाणीव होण्याऐवजी त्याला धुक्यातून जाणवलेले पन्हाळगडाचे नैसर्गिक सौंदर्य भाकले.

मामू हा परोपकारी होता. सेवाभावी होता. त्यामुळे तो कधीही, कोणालाही, कोणतीही मदत करायला तत्परतेने तयार असे. एखादयाला दुकान चालवण्यासाठी थोडा वेळ मदत करणे इथपासून ते उर्दू शिकवण्यासाठी शिक्षक होणे इथपर्यंतच्या सर्व प्रकारच्या भूमिका तो करत असे. कधी तो मौलवी असे. कधी व्यापारी, तर कधी उस्ताद. विविध प्रकारची कामे करता करता त्याने अनेक प्रकारची कौशल्ये आत्मसात केला. त्यामुळे त्याला लेखकांनी बहुरूप्याची उपमा दिली आहे

मामू सर्वांशी प्रेमाने, सेवाभावी वृत्तीने, नम्रपणाने, निगर्वीपणे वागत राहिला. साहजिकच समाजातल्या सर्व थरांतल्या अनेक लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले. म्हणून मुलाच्या लग्नाच्या वेळी आमदार, खासदार, व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक अशी विविध क्षेत्रांतली माणसे हजर होती. मात्र, या प्रसंगाने त्याच्या मनात गर्वाची भावना निर्माण झाली नाही. या क्षणीसुद्धा तो विनम्र होता. शाळेत कोणत्याही कामासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे काम तो तत्परतेने करून देई. शाळेतल्या मुलांची तो आईच्या मायेने काळजी घेई. शाळेत होणारे कार्यक्रम, भाषणे, चर्चा तो मनापासून ऐकत असे. ऐकलेले मनात साठवून ठेवत असे. त्यामुळे अनेक विषयांचे ज्ञान त्याच्या डोक्यात साठवलेले असे. सर्वांविषयी त्याला ममत्व वाटत असल्याने तो सगळ्यांची आपलकीने चौकशी करी. सल्ले देई, आपले काम तो चोख व पद्धतशीरपणे करीत असे. एकंदरीत, किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय.



'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.


SOLUTION

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. म्हणून तो गट करून राहता. आणि असा गट करताना बहुतेक वेळा माणसे जातिधर्माच्या साहाय्याने एकत्र होतात. धर्मावरून एकमेकांना ओळखत, आमण वेगवेगळ्या धर्माना वेगवेगळे गुण चिकटवून टाकले आहेत. विशिष्ट धर्माचे लोक विशिष्ट स्वभावगुणांनी युक्त असतात, असे आपण ठरवून टाकले आहे. माणसांचे हे वर्तन शतकानुशतके चालू आहे. लेखकांना माणसांची ही वृत्ती माहीत आहे.

या पाठातील मामूच्या सहवासाने समाजाची ही चूक ठळकपणे लेखकांच्या लक्षात येते. मामू हा धर्माने मुसलमान आहे. वाचकाला हे केवळ दोन-तीन तपशिलांतूनच कळते. त्याच्या पलीकडे मामूच्या वर्णनात कुठेही धर्माचा संबंध येत नाही. मामूचे संपूर्ण वागणेच धर्मनिरपेक्ष आहे. तो आणि इतर माणसे या सगळ्यांचे वागणे सारखेच आहे. माम। भोवतालच्या समाजामध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. तो जाती-धर्माच्या पलीकडे गेला आहे. तो स्वाकडे माणूस म्हणूनच पाहतो.

लेखकांना मामूचा दहा वर्षे सहवास लाभला आहे. या दहा वर्षात मामूचा साधेपणा, सरळपणा, निष्कपटपणा, सेवाभावी वृत्ती हे माणसामधले चांगले गुणच लेखकांच्या प्रत्ययाला आले आहेत. म्हणजे मामू हा आरपार सज्जन माणूस आहे.

शाळेत शिपाई म्हणून काम करताना त्याच्या मनात कधीही धर्माची भावना निर्माण झाली नाही. कोणत्याही सच्च्या भारतीयाप्रमाणे त्याचीही देशभक्ती प्रामाणिक आहे. शाळेतला मुलगा असो वा शिक्षक असो त्याच्याशी मामू धर्म न पाहता आत्मीयतेने वागतो. म्हणूनच जात- धर्माच्या पलीकडे जाऊन अनेक माणसांशी त्याचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत; हे त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सिद्ध होते. माणसाने किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय. मामूच्या उदाहरणावरून लेखकांना धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, ही जाणीव मनात ठसून जाते.


.

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.

11th Marathi Maharashtra Board




.