(i) प्राप्ती संकल्पना :
एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च, सीमांत प्राप्ती
(ii) संख्यात्मक पतनियंत्रण साधने :
बँक दर, खुल्या बाजारातील रोख व्यवहार, परकीय विनिमय दर, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर
(iii) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती :
वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत
(iv) करेतर उत्पन्न :
शुल्क, दंड, संपत्ती कर, अधिभार
(v) साध्या निर्देशांकांचे प्रकार :
लासपेअरचा किंमत निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक
(क) अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा.(५)
(i) एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय.
(ii) अशा इच्छा, जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.
(i) खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
वस्तूचे नग
एकूण उपयोगिता
सीमांत उपयोगिता
१
६
२
५
३
१५
४
४
१५
५
-१
प्रश्न :
(१) वरील तक्ता पूर्ण करा. (२)
(२) (अ) जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता — (१)
(ब) जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता — (१)
(ii) आकृतीमधील 'अ इ' हा रेषीय मागणी वक्र आहे, आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य, की असत्य ते लिहा. (४)
(१) 'क' या बिंदूवर मागणी अधिक लवचीक आहे. (१)
(२) 'ब' या बिंदूवर मागणी एकक लवचीक आहे. (१)
(३) 'ड' या बिंदूवर मागणी संपूर्ण अलवचीक आहे. (१)
(४) 'अ' या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचीक आहे. (१)
(iii) खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया . (४)
भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय.
निर्देशांक हा अर्थतज्ञ, शेतकरी, व्यापारी, शासक, शिक्षणतज्ञ आणि मजूर संघटनांचे पुढारी या सर्वांना आपआपल्या क्षेत्रातील योजना आखणे आणि कार्यान्वित करण्यासाठी एक अत्यंत उपयोगी साधन आहे.
निर्देशांकाची व्याप्ती एका विशिष्ट विषयापुरती सीमित न राहता ती अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल यांतही विस्तारलेली आहे.
निर्देशांक काढत असताना आपणांस निर्देशांक कशासाठी तयार करावयाचे आहेत याची उद्दिष्टे प्रथम निश्चित करावी लागतात व त्या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती वेगवेगळ्या मार्गांनी गोळा करावी लागते व या माहितीचा वापर आपण ज्या काळासाठी तुलना करावयाची आहे त्या काळाच्या तुलनात्मक अभ्यासासाठी वापरला जातो. हे काढण्यासाठी आधार वर्षाची पातळी १०० मानली जाते व चालू वर्षाचा निर्देशांक काढला जातो.
निर्देशांक काढण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती लासपेअर, पाश्चे, फिशर यांनी सांगितल्या आहेत.
प्रश्न :
(१) निर्देशांकाचा अर्थ सांगा. (१)
(२) निर्देशांकाचा वापर कोणास होतो? (१)
(३) वरील उताऱ्याविषयी स्वमत लिहा. (२)
प्र.६. सविस्तर उत्तरे लिहा (कोणतीही दोन).[१६]
(१) मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा.
(२) मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
(३) सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा.