OMTEX AD 2

HSC Economics Question Paper March 2023 Solution Maharashtra Board Marathi Medium

HSC Economics Board Paper 2023 - Solutions
Maharashtra Board HSC Economics Question Paper 2023

बोर्ड प्रश्नपत्रिका : मार्च २०२३
अर्थशास्त्र (Economics)

वेळ: ३ तास | एकूण गुण: ८०

प्र. १. (अ) खालील विधाने पूर्ण करा. [५]

(i) सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते _______ .

  • (अ) उत्पन्न सिद्धांत
  • (ब) किंमत सिद्धांत
  • (क) वृद्धी सिद्धांत
  • (ड) रोजगार सिद्धांत

उत्तर: (ब) किंमत सिद्धांत

(ii) नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण _______ .

  • (अ) अपुरी बचत
  • (ब) रोख रकमेची वाढती मागणी
  • (क) असंघटित क्षेत्र
  • (ड) वित्तीय गैरव्यवस्था

उत्तर: (अ) अपुरी बचत

(iii) जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता _______ .

  • (अ) वाढते
  • (ब) स्थिर असते
  • (क) घटते
  • (ड) शून्य असते

उत्तर: (क) घटते

(iv) कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही _______ .

  • (अ) स्थिर असते
  • (ब) वाढती असते
  • (क) घटती असते
  • (ड) बदलती असते

उत्तर: (ब) वाढती असते

(v) हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यांत _______ .

  • (अ) प्रत्यक्ष संबंध असतो
  • (ब) व्यस्त संबंध असतो
  • (क) कोणताही बदल नाही
  • (ड) प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो

उत्तर: (ब) व्यस्त संबंध असतो

Economics Board Questions with Solution

(ब) विसंगत शब्द ओळखा. [५]

(i) प्राप्ती संकल्पना: एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च, सीमांत प्राप्ती

उत्तर: एकूण खर्च

(ii) संख्यात्मक पतनियंत्रण साधने: बँक दर, खुल्या बाजारातील रोख व्यवहार, परकीय विनिमय दर, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर

उत्तर: परकीय विनिमय दर

(iii) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती: वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत

उत्तर: आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत

(iv) करेतर उत्पन्न: शुल्क, दंड, संपत्ती कर, अधिभार

उत्तर: संपत्ती कर

(टीप: संपत्ती कर हा प्रत्यक्ष कर आहे, करेतर उत्पन्न नाही.)

(v) साध्या निर्देशांकांचे प्रकार: लासपेअरचा किंमत निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक

उत्तर: लासपेअरचा किंमत निर्देशांक

(टीप: हा भारान्वित निर्देशांकाचा प्रकार आहे.)

(क) अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. [५]

(i) एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय.

उत्तर: राष्ट्रीय उत्पन्न (किंवा अंतिम वस्तू पद्धत)

(ii) अशा इच्छा, जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.

उत्तर: मागणी

(iii) किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल.

उत्तर: मागणीतील विचलन (किंवा किंमतजन्य मागणी)

(iv) प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार.

उत्तर: मक्तेदारीयुक्त स्पर्धा

(v) स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला.

उत्तर: काल उपयोगिता

(ड) विधाने व तर्क प्रश्न सोडवा. [५]

(i) विधान (अ): पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत, मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते.
तर्क विधान (ब): असंख्य ग्राहक आणि विक्रेते असल्याने कोणतीही एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही.

उत्तर: (क) दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

(ii) विधान (अ): एका वस्तूच्या किंमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो.
तर्क विधान (ब): उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो.

उत्तर: (ड) दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

(स्पष्टीकरण: पहिले विधान छेदक लवचिकता दर्शवते आणि दुसरे विधान उत्पन्न लवचिकता दर्शवते. दोन्ही सत्य आहेत पण एकमेकांचे स्पष्टीकरण नाहीत.)

(iii) विधान (अ): स्व: उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही.
तर्क विधान (ब): स्व: उपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही.

उत्तर: (ब) विधान 'अ' असत्य आहे; पण तर्कविधान 'ब' सत्य आहे.

(स्पष्टीकरण: १२वी च्या पाठ्यपुस्तकानुसार, स्व-उपभोगासाठीच्या उत्पादनाचे अंदाजित मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जाते. त्यामुळे विधान 'अ' तांत्रिकदृष्ट्या असत्य मानले जाते.)

(iv) विधान (अ): व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते.
तर्क विधान (ब): भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते.

उत्तर: (ब) विधान 'अ' असत्य आहे; पण तर्कविधान 'ब' सत्य आहे.

(स्पष्टीकरण: परकीय विनिमय नियंत्रण हे मध्यवर्ती बँकेचे (RBI) कार्य आहे, व्यापारी बँकेचे नाही.)

(v) विधान (अ): पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे.
तर्क विधान (ब): पुरवठा नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो.

उत्तर: (क) दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.


प्र. २. (अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा (कोणतेही तीन). [६]

(i) एका टेबल विक्रेत्याने ₹ २,००० प्रतिटेबल याप्रमाणे १५ टेबलची विक्री केली त्यापासून त्याला ₹ ३०,००० मिळाले.

संकल्पना: एकूण प्राप्ती (Total Revenue)

स्पष्टीकरण: वस्तूच्या विक्री नंतर संयोजकाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय.
सूत्र: एकूण प्राप्ती = किंमत × नगसंख्या (२००० × १५ = ३००००).

(ii) इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले.

संकल्पना: पुनर्निर्यात व्यापार (Entreport Trade)

स्पष्टीकरण: जेव्हा एका देशातून माल आयात करून, त्यावर प्रक्रिया करून किंवा तसाच तो दुसऱ्या देशाला निर्यात केला जातो, तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात.

(iii) अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला.

संकल्पना: प्रत्यक्ष कर (Direct Tax)

स्पष्टीकरण: जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो आणि ज्याचा बोजा दुसऱ्यावर ढकलता येत नाही, त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात.

(iv) राजूचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.

संकल्पना: भांडवल बाजार (Capital Market)

स्पष्टीकरण: भांडवल बाजार ही अशी बाजारपेठ आहे जिथे दीर्घकालीन निधीचे (समभाग, कर्जरोखे इ.) व्यवहार होतात.

(v) गरीब व्यक्तीला कार हवी आहे.

संकल्पना: इच्छा (Desire)

स्पष्टीकरण: केवळ एखाद्या वस्तूची आस असणे म्हणजे इच्छा होय. इथे खरेदी शक्तीचा अभाव असल्याने ही केवळ इच्छा आहे, मागणी नाही.

(ब) फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन). [६]

(i) एकक लवचीक मागणी आणि जास्त लवचीक मागणी:

  • एकक लवचीक: किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकाच मागणीत शेकडा बदल होतो (Ed = 1).
  • जास्त लवचीक: किंमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जास्त असतो (Ed > 1).

(ii) राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती:

  • उत्पादन पद्धती: एका वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारमूल्य विचारात घेतले जाते.
  • उत्पन्न पद्धती: उत्पादनाच्या घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यांची (खंड, वेतन, व्याज, नफा) बेरीज केली जाते.

(iii) मागणी ठेव आणि मुदत ठेव:

  • मागणी ठेव: खातेदाराच्या मागणीनुसार कधीही काढता येणाऱ्या ठेवी (उदा. बचत व चालू खाते). व्याजदर कमी असतो.
  • मुदत ठेव: विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेल्या ठेवी. मुदतपूर्व काढता येत नाहीत (साधारणपणे). व्याजदर जास्त असतो.

प्र. ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन). [१२]

(i) सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणत्याही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर:

  1. किंमत निर्धारण: वस्तूंच्या आणि उत्पादन घटकांच्या किंमती कशा ठरतात हे समजण्यास मदत होते.
  2. मुक्त बाजार अर्थव्यवस्था: मुक्त बाजारपेठेची कार्यपद्धती समजण्यास उपयुक्त.
  3. व्यवसायातील निर्णय: उत्पादन खर्च, किंमत धोरण, नफा इत्यादींविषयी निर्णय घेण्यास संयोजकास मदत.
  4. शासनास उपयुक्त: कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण ठरवण्यासाठी शासनास मार्गदर्शन करते.

(ii) मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर (शेकडेवारी) पद्धत स्पष्ट करा.

उत्तर: या पद्धतीत मागणीतील शेकडा बदलाला किंमतीतील शेकडा बदलाने भागले जाते.
सूत्र: \( Ed = \frac{\%\Delta Q}{\%\Delta P} \)
जेथे, \( \Delta Q \) = मागणीतील बदल, \( \Delta P \) = किंमतीतील बदल.

(iii) राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर:

  1. स्थूल आर्थिक संकल्पना: हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे उत्पन्न दर्शवते.
  2. अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य: फक्त अंतिम वस्तूंचे मूल्य मोजले जाते, मध्यम वस्तूंचे नाही.
  3. निव्वळ समग्र मूल्य: यात घसारा खर्च वजा केला जातो.
  4. प्रवाही संकल्पना: हे एका विशिष्ट कालावधीत (एका वर्षात) मोजले जाते.


प्र. ४. खालील विधानांशी आपण सहमत आहात, की नाही ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन). [१२]

(i) पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत.

उत्तर: मी या विधानाशी असहम आहोत.

कारण: पुरवठ्याच्या नियमाला खालील अपवाद आहेत: १. श्रमाचा पुरवठा (मागे वळणारा वक्र), २. कृषी उत्पादने (हवामानावर अवलंबून), ३. रोख रकमेची तीव्र गरज, ४. नाशवंत वस्तू.

(ii) व्यापारतोल आणि व्यवहारतोल या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत.

उत्तर: मी या विधानाशी सहमत आहे.

कारण: 'व्यापारतोल' मध्ये फक्त दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यातीचा समावेश होतो. तर 'व्यवहारतोल' मध्ये दृश्य वस्तू, अदृश्य सेवा, आणि भांडवली व्यवहारांचा समावेश होतो. व्यवहारतोल ही व्यापक संकल्पना आहे.

(iii) निर्देशांक अर्थशास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे.

उत्तर: मी या विधानाशी सहमत आहे.

कारण: १. आर्थिक धोरणे ठरवण्यासाठी उपयुक्त. २. चलनवाढ मोजण्यासाठी. ३. भविष्यातील आर्थिक कल समजण्यासाठी. ४. राहणीमान मोजण्यासाठी.

(iv) राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाहीत.

उत्तर: मी या विधानाशी असहम आहोत.

कारण: अनेक तात्विक अडचणी येतात, जसे की: १. हस्तांतरित देणी (Transfer Payments). २. बेकायदेशीर उत्पन्न. ३. विना-मोबदला सेवा. ४. स्व-उपभोगासाठीचे उत्पादन.

(v) स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.

उत्तर: मी या विधानाशी सहमत आहे.

कारण: सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते (उदा. एक उपभोक्ता), तर स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते (उदा. राष्ट्रीय उत्पन्न). त्यांची व्याप्ती आणि साधने भिन्न आहेत.


प्र. ५. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन). [८]

(i) खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

वस्तूचे नग एकूण उपयोगिता (TU) सीमांत उपयोगिता (MU)
११
१५
१५
१४ -१

प्रश्न (१): वरील तक्ता पूर्ण करा.

उत्तर: वरील तक्त्यात गडद अक्षरात उत्तरे दिली आहेत.

प्रश्न (२) (अ): जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता _______ .

उत्तर: शून्य असते.

प्रश्न (२) (ब): जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता _______ .

उत्तर: ऋण असते.

(ii) आकृतीमधील 'अ इ' हा रेषीय मागणी वक्र आहे. विधाने सत्य की असत्य लिहा.

(आकृतीत रेषीय मागणी वक्र दर्शविला आहे. 'क' बिंदू मध्यबिंदूच्या खाली, 'ब' बिंदू मध्यभागी, 'ड' बिंदू क्ष-अक्षावर आणि 'अ' बिंदू य-अक्षावर आहे.)

linear demand curve

(१) 'क' या बिंदूवर मागणी अधिक लवचीक आहे.

उत्तर: असत्य (क बिंदू खालच्या भागात असल्याने मागणी कमी लवचीक असते).

(२) 'ब' या बिंदूवर मागणी एकक लवचीक आहे.

उत्तर: सत्य (मध्यबिंदूवर लवचिकता = १ असते).

(३) 'ड' या बिंदूवर मागणी संपूर्ण अलवचिक आहे.

उत्तर: सत्य (क्ष-अक्षावर लवचिकता = ० असते).

(४) 'अ' या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचीक आहे.

उत्तर: सत्य (य-अक्षावर लवचिकता = अनंत असते).

(iii) उताऱ्यावरील प्रश्न.

(१) निर्देशांकाचा अर्थ सांगा.

उत्तर: भौगोलिक स्थान, वेळ किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय.

(२) निर्देशांकाचा वापर कोणास होतो?

उत्तर: निर्देशांक अर्थतज्ज्ञ, शेतकरी, व्यापारी, शासक, शिक्षणतज्ज्ञ आणि मजूर संघटनांचे पुढारी या सर्वांना उपयोगी पडतो.

(३) वरील उताऱ्याविषयी स्वमत लिहा.

उत्तर: निर्देशांक हे केवळ अर्थशास्त्रापुरते मर्यादित नसून ते इतिहास, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत उपयुक्त आहे. भविष्यातील नियोजन आणि धोरणे आखण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी संख्याशास्त्रीय साधन आहे.


प्र. ६. सविस्तर उत्तरे लिहा (कोणतीही दोन). [१६]

(१) मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा.

रूपरेषा:
१. प्रस्तावना: डॉ. अल्फ्रेड मार्शल यांनी १८९० मध्ये 'अर्थशास्त्राची मूलतत्वे' या ग्रंथात हा नियम मांडला.
२. सिद्धांत: "इतर परिस्थिती स्थिर असताना, वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते."
३. तक्ता व आकृती: किंमत आणि मागणी यांचा व्यस्त संबंध दाखवणारा तक्ता व आकृती काढावी (मागणी वक्र वरून खाली येणारा).
४. अपवाद:

  • गिफेन वस्तू (हलक्या प्रतीच्या वस्तू).
  • प्रतिष्ठेच्या वस्तू.
  • भविष्यकालीन किंमतीचा अंदाज.
  • किंमतीचा आभास.
  • सवयीच्या वस्तू.

(२) मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

रूपरेषा:
१. अर्थ: 'मक्तेदारी' (Monopoly) म्हणजे असा बाजार जिथे एकच विक्रेता असतो आणि ज्याचे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. वस्तूला जवळचा पर्याय नसतो.
२. वैशिष्ट्ये:

  • एकच विक्रेता.
  • पर्यायी वस्तूंचा अभाव.
  • प्रवेशावर निर्बंध.
  • बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण.
  • मूल्यभेद (Price Discrimination).
  • उद्योग संस्था हीच उद्योग.

(३) सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा.

रूपरेषा:
१. शासनाच्या कार्यात वाढ: संरक्षण, प्रशासन यासोबतच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी.
२. लोकसंख्येचा जलद वाढ: वाढत्या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरवण्यासाठी खर्च वाढतो.
३. शहरीकरण: शहरांमधील रस्ते, वीज, पाणी यावरील खर्च.
४. संरक्षण खर्च: आधुनिक युद्धसामग्री आणि सुरक्षेवरील खर्च.
५. लोकशाही पद्धती: निवडणुका आणि लोकशाही प्रक्रियेवर होणारा खर्च.
६. भाववाढ: वस्तू व सेवांच्या किंमती वाढल्याने शासनाचा खर्च वाढतो.
७. आपत्ती व्यवस्थापन: नैसर्गिक आपत्तींसाठी (पूर, दुष्काळ) होणारा खर्च.

OMTEX CLASSES AD