OMTEX AD 2

Maharashtra Board HSC Economics Question Paper July 2025 Marathi Medium

बोर्ड प्रश्नपत्रिका : जुलै २०२५ - अर्थशास्त्र (Economics)

बोर्ड प्रश्नपत्रिका : जुलै २०२५

अर्थशास्त्र

वेळ: ३ तास एकूण गुण : ८०
सूचना:
(१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
(२) आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके / आकृत्या काढा.
(३) उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
(४) सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत.
HSC Economics Board Paper July 2025
प्र.१. (अ) योग्य पर्याय निवडा : (५) [२०]
(i) सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण वापरली जाणारी पद्धत.
(अ) राशी पद्धत
(ब) समग्र पद्धत
(क) विभाजन पद्धत
(ड) सर्वसमावेशक पद्धत
पर्याय : (१) अ, क आणि ड
(२) अ, ब आणि ड
(३) फक्त क
(४) फक्त अ
(ii) पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते.
(अ) किंमतकर्ता
(ब) किंमत स्वीकारणारा
(क) किंमतभेद करणारा
(ड) यापैकी नाही
पर्याय : (१) अ, ब आणि क
(२) फक्त ब
(३) फक्त क
(४) अ आणि क
(iii) किंमत निर्देशांकाच्या संबंधात असलेली विधाने शोधा.
(अ) निर्देशांक एक भौगोलिक साधन आहे.
(ब) निर्देशांकात हवेच्या दाबाचे मोजमाप केले जाते.
(क) निर्देशांकात आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप केले जाते.
(ड) निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो.
पर्याय : (१) क आणि ड
(२) अ, आणि ब
(३) ब आणि क
(४) अ आणि ड
(iv) सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो.
(अ) परकीय आक्रमणापासून संरक्षण
(ब) अंतर्गत कायदा व सुव्यवस्था
(क) कल्याणकारी उपाययोजना
(ड) वस्तू व सेवांची निर्यात
पर्याय : (१) क आणि ड
(२) अ, आणि ब
(३) फक्त ब
(४) अ, क आणि ड
(v) विदेशी व्यापाराचे प्रकार खालीलप्रकारे आहेत.
(अ) आयात व्यापार
(ब) निर्यात व्यापार
(क) पुनर्निर्यात व्यापार
(ड) अंतर्गत व्यापार
पर्याय : (१) अ, आणि ब
(२) अ, ब आणि क
(३) अ, ब, क आणि ड
(४) यापैकी नाही

Economics Board Questions with Solution

(ब) अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा : (५)
(i) अशी इच्छा, जिला खरेदीशक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.
(ii) एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ.
(iii) बाजाराचा असा प्रकार ज्यात काही विक्रेते असतात.
(iv) एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य.
(v) राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री.
(क) खालील विधाने पूर्ण करा : (५)
(i) सूक्ष्म अर्थशास्त्राला ----------- म्हणूनही ओळखले जाते.
(अ) किंमत सिद्धांत
(ब) उत्पन्न सिद्धांत
(क) वृद्धीचे सिद्धांत
(ड) विकासाचे सिद्धांत
(ii) जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमान्त उपयोगिता -----------
(अ) धन असते
(ब) ऋण असते
(क) शून्य असते
(ड) एक असते
(iii) 'क्ष' अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र -----------
(अ) संपूर्ण लवचीक मागणी
(ब) संपूर्ण अलवचीक मागणी
(क) जास्त लवचीक मागणी
(ड) कमी लवचीक मागणी
(iv) भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेद्वारे वापरली जाणारी पद्धत -----------
(अ) उत्पादन पद्धती
(ब) उत्पन्न पद्धती
(क) खर्च पद्धती
(ड) उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण
(v) अल्पमुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार -----------
(अ) नाणे बाजार
(ब) भांडवल बाजार
(क) श्रम बाजार
(ड) वस्तू बाजार
(ड) विसंगत शब्द ओळखा : (५)
(i) उपयोगितेचे प्रकार :
रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सीमान्त उपयोगिता, सेवा उपयोगिता
(ii) मागणीचे निर्धारक घटक :
किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, गिफेनचा विरोधाभास
(iii) मागणीच्या किंमत लवचीकता मोजण्याच्या पद्धती : उत्पन्न पद्धती, शेकडेवारी पद्धती, एकूण खर्च पद्धती, बिंदू पद्धती / भूमिती पद्धती
(iv) पुरवठा नियमाचे अपवाद :
श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, प्रतिष्ठेच्या वस्तू, नाशवंत वस्तू
(v) करेतर उत्पन्नाचे स्रोत :
शुल्क, सीमा शुल्क, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा
प्र.२. (अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा (कोणतेही तीन): (६) [१२]
(i) राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली.
(ii) x वस्तूच्या किमतीत २०% ने वाढ झाली असता x वस्तूच्या मागणीत २०% ने घट होते.
(iii) स्वराला महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा ₹ ८००० निवृत्तीवेतन मिळते.
(iv) तुषारने ₹ १,००,००० एक रकमी रक्कम तीन वर्षाकरिता बँकेत जमा केली.
(v) कागदाच्या किमती स्थिर असून सुद्धा कागद बनविण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणी मुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला.
(ब) फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन): (६)
(i) विभाजन पद्धत आणि राशी पद्धत
(ii) मागणीतील विस्तार आणि मागणीतील वृद्धी
(iii) साठा आणि पुरवठा
(iv) साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक
(v) सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार
प्र.३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन): [१२]
(i) सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
(ii) पूर्ण स्पर्धेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
(iii) भारतीय रिझर्व्ह बँकेची कोणतीही चार कार्ये स्पष्ट करा.
(iv) राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान स्पष्ट करा.
(v) निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा.
प्र.४. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन): [१२]
(i) घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला कोणतेही खरे अपवाद नाहीत.
(ii) मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
(iii) निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत.
(iv) भारतातील नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो.
(v) व्यवहारातील आणि व्यापारातील ह्या दोन संकल्पनांमध्ये फरक नाही.
प्र.५. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही दोन): [८] (४)
(i) खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा :
वस्तूचे नग एकूण उपयोगिता
(TU)
सीमांत उपयोगिता
(MU)
१०
१८
२८
३०
३०
-२

प्रश्न :
(१) वरील तक्ता पूर्ण करा. (२)
(२) जेव्हा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता (१)
(३) वस्तूचे सहा नग उपभोगल्यावर सीमांत उपयोगिता उपयोगिता होते. (१)

(ii) खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा: (४) Graph A shows Extension of Supply, Graph B shows Increase in Supply

आकृती 'अ' आणि आकृती 'ब' (पुरवठा वक्र)

(कृपया मूळ प्रश्नपत्रिकेतील आकृत्या पहा)

प्रश्न :
(१) आकृती ‘अ’ पुरवठ्यातील ----------- दर्शवते. (१)
(२) आकृती ‘ब’ पुरवठ्यातील ----------- दर्शवते. (१)
(३) आकृती ‘अ’ मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या ----------- बाजूस सरकतो. (१)
(४) आकृती ‘ब’ मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या ----------- बाजूस सरकतो. (१)

(iii) खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया : (४)

भारत सरकार आणि सरकारच्या विविध संस्था आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निरीक्षण आणि गणना विविध पद्धतीने करतात जसे एकूण उत्पादन पद्धत, उत्पन्न आणि एकूण खर्च पद्धत, इ. मुळे आपल्याला भारताच्या आर्थिक कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र समजते.

सन २००१ ते २०२१ च्या कालावधीत भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन सरासरी वार्षिक ६ ते ७% नी वाढले. भारतात प्रामुख्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत अधिक वैविध्यपूर्ण झालेला बदल भारताने पाहिला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या रचनेमध्ये सेवा आणि औद्योगिक क्षेत्र प्रमुख भूमिका बजावत आहेत.

तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या अर्थव्यवस्थेत बरेच चढउतार व आव्हाने होती. २००८ मधील जागतिक आर्थिक संकट आणि २०२० मधील कोविड-१९ साथीच्या रोगामुळे उत्पन्न वाढीच्या प्रवृत्तीत तात्पुरता व्यत्यय आला.

अलीकडच्या वर्षात भारताने शाश्वत आर्थिक विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या सारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक क्रिया आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

प्रश्न :
(१) २००१ ते २०२१ या कालावधीसाठी भारताचा सरासरी वार्षिक विकास दर किती आहे? (१)
(२) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्या घटकांनी व्यत्यय आणला? (१)
(३) दिलेल्या उताऱ्यावर स्वमत लिहा. (२)
प्र.६. सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन): [१६]
(i) मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा.
(ii) मागणीची लवचीकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा.
(iii) भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा.

OMTEX CLASSES AD