OMTEX AD 2

HSC Board Question Paper July 2023: Organization of Commerce and Management (Marathi Medium)

HSC Board Question Paper July 2023: Organization of Commerce and Management (Marathi)

बोर्ड प्रश्नपत्रिका : जुलै २०२३

वाणिज्य संघटन व व्यवस्थापन

वेळ: ३ तास एकूण गुण : ८०

सूचना:

  1. (१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. (२) उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
  3. (३) डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
  4. (४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी.
HSC Economics Board Paper July 2025
प्र.१. (अ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. [५]
(१) व्यवस्थापनाचे कार्य _______ या कार्याने संपतात.
(अ) निर्देशन (ब) कर्मचारी व्यवस्थापन (क) नियंत्रण
(२) _______ शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोकवसाहत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त करते.
(अ) कृषी पर्यटन (ब) वैद्यकीय पर्यटन (क) मनोरंजन
(३) _______ वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते.
(अ) रेल्वे (ब) रस्ते (क) हवाई
(४) ऑनलाईन खरेदीदार वस्तूची निवड करतो आणि _______ मध्ये टाकतो.
(अ) शॉपिंग मॉल (ब) शॉपिंग कार्ट (क) शॉपिंग बॅग
(५) _______ 'जागतिक ग्राहक दिन' म्हणून साजरा केला जातो.
(अ) २४ डिसेंबर (ब) २६ जानेवारी (क) १५ मार्च

12th OCM Board Papers (March & July 2025)

(ब) योग्य जोड्या जुळवा. (५)
'अ' गट 'ब' गट
(अ) शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत (१) हेन्री फेयॉल
(ब) समन्वय (२) व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा (BPO)
(क) बाह्यसेवा (३) एफ. डब्ल्यू. टेलर
(ड) व्यवसायनीतीशास्त्र (४) रस्ते वाहतूक कार्यालय (RTO)
(इ) नोंदणीकृत बोधचिन्ह (५) गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण
(६) नफा मिळविणे
(७) व्यवस्थापन करणे म्हणजे अंदाज बांधून आराखडा आखणे
(८) व्यापारी चिन्ह
(९) समाजशास्त्राची शाखा
(१०) भारतीय प्रमाणित संस्था (ISI)

12th OCM Board Papers (March & July 2024)

(क) खालील विधाने 'बरोबर' की 'चूक' ते लिहा. (५)
  1. (१) व्यवस्थापनाची तत्त्वे सार्वत्रिक आहेत.
  2. (२) व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते.
  3. (३) औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनाची जबाबदारी असते.
  4. (४) भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही.
  5. (५) नियंत्रित बाजार हा मागणी व पुरवठ्याच्या प्रमाणावर चालतो.

12th OCM Board Papers (February & July 2023)

(ड) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा: (५)
  1. (१) नोकरीतील सुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते.
  2. (२) कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्राशी निगडित आहे.
  3. (३) अप्रामाणिकपणे केलेल्या जाहिरातीला ग्राहक दीर्घकाळ स्वीकृती देतात.
  4. (४) जिल्हा आयोग लोक न्यायालय म्हणूनही ओळखले जाते.
  5. (५) प्रतवारीमुळे वस्तूची मोडतोड, नुकसान व हानी टाळण्यास मदत होते.

12th OCM Board Papers (2014 - 2022)

  • OCM - March 2022 English Medium: View
  • OCM - March 2022 Marathi Medium: View | Answer Key
  • OCM - July 2022 English Medium: View | Answer Key
  • OCM - March 2020 English Medium: View
  • OCM - March 2020 Marathi Medium: View | Answer Key
  • OCM - March 2019: View
  • OCM - July 2018: View
  • OCM - March 2018: View
  • OCM - July 2017: View
  • OCM - March 2017: View
  • OCM - July 2016: View
  • OCM - March 2016: View
  • OCM - July 2015: View
  • OCM - March 2015: View
  • OCM - October 2014: View
  • OCM - March 2014: View
प्र.२. खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार). [८]
(१) थकवा अभ्यास (२) नियोजन (३) संदेशवहन (४) सामाजिक जबाबदारी (५) नैतिक मूल्ये (६) ग्राहक शिक्षणाचा अधिकार
प्र.३. खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणतेही दोन). [६]
(१) श्री. हर्षद एक उद्योजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात. सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात, तर महिला संवेष्टन (पॅकेजिंग) विभागात कार्यरत आहेत. श्री. शरथ वित्त व्यवस्थापक (finance manager) तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक (HR manager) म्हणून कार्यरत असून त्या कारखान्यात कर्मचारी नेमणूक करण्यासाठी जबाबदार आहेत, या आधारे

(अ) वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणते तत्त्व समाविष्ट आहे?
(ब) या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे?
(क) संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे?
(२) श्री. जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या दोन मुलांसाठी संरक्षण देणारी, तसेच सज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी घेऊ इच्छितात.

(अ) श्री. जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा.
(ब) विमा पॉलिसीचे लाभार्थी कोण आहेत?
(क) वरील घटनेमध्ये विम्याच्या कोणत्या तत्त्वाचा समावेश होतो?
(३) एका वाहन निर्मिती कंपनीने पुढील कार्यपद्धतींचा स्वीकार केला आहे.
(अ) कंपनीकडून फक्त पर्यावरणपूरक घटकांचा वापर केला जातो.
(ब) हानिकारक अशा टाकाऊ वस्तूंवर योग्य ती प्रक्रिया करूनच त्यांची विल्हेवाट लावली जाते.
(क) आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे वाहनांच्या प्रदूषणाची पातळी राखली जाते.

(i) वरील व्यवसाय संघटना कोणत्या समूहाप्रति आपली सामाजिक जबाबदारी पार पडतात?
(ii) व्यवसाय संघटनेला कोणत्या प्रकारचे प्रदूषण होण्यापासून थांबवायचे आहे?
(iii) कोणत्या प्रकारचा संदेश त्यांना द्यावयाचा आहे?
प्र.४. खालील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन): [१२]
(१) संघटन आणि समन्वय (२) रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक (३) अग्नि विमा आणि सागरी विमा (४) जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग
प्र.५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन): [८]
  1. (१) बाह्यसेवेचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा.
  2. (२) ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा.
  3. (३) विपणनाची कोणतीही चार कार्ये स्पष्ट करा.
प्र.६. खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन): [८]
  1. (१) टेलर यांनी साधने व उपकरणे मानकीकरणावर भर दिला आहे.
  2. (२) उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा.
  3. (३) इंटरनेटच्या साहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात.
  4. (४) ग्राहकांस अनेक जबाबदाऱ्या आहेत.
प्र.७. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन). [१०]
  1. (१) नियंत्रणाचे महत्त्व सांगा.
  2. (२) गोदामाची कार्ये सांगा.
  3. (३) विपणीचे क्षेत्रानुसार व व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा.
प्र.८. बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांची दुय्यम कार्ये स्पष्ट करा. [८]
किंवा
समाजासाठी व व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा.

OMTEX CLASSES AD