Board Question Paper : February 2020
ORGANISATION OF COMMERCE AND MANAGEMENT
Time: 3 Hours
Max. Marks: 80
सूचना :
- (१) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- (२) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
- (३) डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
- (४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
प्र. १. (अ) प्रश्नांच्या खाली दिलेल्या संभाव्य पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा व संपूर्ण विधाने पुन्हा लिहा.
[५]
(१) अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायात कर्त्याची जबाबदारी _______ असते.
(२) भारतामध्ये रेल्वेची मालकी व व्यवस्थापन _______ कडून केले जाते.
(३) आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकाला _______ असे संबोधतात.
(४) हेन्री फेयॉलला _______ व्यवस्थापनाचा जनक असे म्हणतात.
(५) व्यवसायाचे अंतिम ध्येय _______ समाधान करणे हे आहे.
12th OCM Board Papers (March & July 2025)
- OCM - March 2025 English Medium: View | Answer Key
- OCM - March 2025 Marathi Medium: View | Answer Key
- OCM - March 2025 Hindi Medium: View | Answer Key
- OCM - July 2025 English Medium: View | Answer Key
- OCM - July 2025 Marathi Medium: View | Answer Key
(ब) खालील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.
(५)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| अ. सर्वमान्य नाममुद्रा (common seal) | १. एक व्यक्ती अनेक वरिष्ठ |
| ब. इ ─ व्यवसाय | २. नाशवंत वस्तू |
| क. आदेशातील एकवाक्यता | ३. व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य |
| ड. शीतगृह | ४. संयुक्त भांडवली संस्था |
| इ. नियंत्रण | ५. इलेक्ट्रॉनिक व्यवसाय |
| ६. व्यवस्थापनाचे अंतिम कार्य | |
| ७. एक व्यक्ती एक वरिष्ठ | |
| ८. भागीदारी संस्था | |
| ९. गुप्तता पाळणे (encryption) | |
| १०. टिकाऊ वस्तू |
12th OCM Board Papers (March & July 2024)
- OCM - March 2024 English Medium: View | Answer Key
- OCM - March 2024 Marathi Medium: View | Answer Key
- OCM - March 2024 Hindi Medium: View | Answer Key
- OCM - July 2024 English Medium: View | Answer Key
(क) खालील विधानासाठी प्रत्येकी ‘एक’ योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा.
(५)
(१) समाजाच्या कल्याणाकडे निर्देश करणारी व्यवसायाची कार्ये, कर्तव्ये.
(२) असा भागीदार जो भागीदारी संस्थेच्या दैनंदिन कारभारात प्रत्यक्ष भाग घेतो.
(३) ग्राहकाचा एक हक्क जो ग्राहकाला स्वतःचे मत मांडण्याची मुभा देतो.
(४) व्यावसायिक कामे करण्यासाठी दुसऱ्या कोणालाही दिल्या जाणाऱ्या आधुनिक करार प्रक्रियेचे नाव.
(५) व्यवस्थापनाचे असे कार्य, की जिथे व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना सूचना देतो, मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो.
12th OCM Board Papers (February & July 2023)
- OCM - February 2023 English Medium: View | Answer Key
- OCM - February 2023 Marathi Medium: View | Answer Key
- OCM - July 2023 English Medium: View | Answer Key
- OCM - July 2023 Marathi Medium: View | Answer Key
प्र. २. खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन).
[१५]
(१) व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था
(२) चालू खाते आणि बचत खाते
(३) जिल्हा मंच आणि राज्य आयोग
(४) नियोजन आणि नियंत्रण
(५) सहकारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था
12th OCM Board Papers (2014 - 2022)
- OCM - March 2022 English Medium: View
- OCM - March 2022 Marathi Medium: View | Answer Key
- OCM - July 2022 English Medium: View | Answer Key
- OCM - March 2020 English Medium: View
- OCM - March 2020 Marathi Medium: View | Answer Key
- OCM - March 2019: View
- OCM - July 2018: View
- OCM - March 2018: View
- OCM - July 2017: View
- OCM - March 2017: View
- OCM - July 2016: View
- OCM - March 2016: View
- OCM - July 2015: View
- OCM - March 2015: View
- OCM - October 2014: View
- OCM - March 2014: View
प्र. ३. खालीलपैकी कोणत्याही तीनवर संक्षिप्त टिपा लिहा.
[१५]
(१) इ-व्यवसायाचे तोटे
(२) ग्राहक संरक्षणाचे महत्त्व
(३) आयुर्विमा पत्रांचे (योजनांचे) (policies) प्रकार
(४) व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व
(५) शासनाप्रती व्यवसाय संघटनेच्या सामाजिक जबाबदाऱ्या
प्र. ४. खालील विधाने ‘बरोबर’ आहेत की ‘चूक’ ते सकारण लिहा (कोणतेही तीन):
[१५]
(१) सहकारी संस्थेचा मुख्य हेतू जास्तीत जास्त नफा मिळविणे हा असतो.
(२) ग्राहक संरक्षण कायदा विक्रेत्यांच्या हितासाठी मंजूर केला गेला होता.
(३) रेल्वे वाहतूक घरपोच सेवा देते.
(४) इ-व्यवसाय जागतिक स्तरावर कुठल्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते.
(५) प्रदूषण नियंत्रणासाठी व्यावसायिक संघटना जबाबदार असतात.
प्र. ५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन):
[१०]
(१) गोदामांचे प्रकार सांगा.
(२) भागीदारांचे प्रकार सांगा.
(३) उद्योजकाची (entrepreneur) कार्ये सांगा.
(४) हेन्री फेयॉलची व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्त्वे सांगा.
प्र. ६. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा (कोणताही एक):
[१०]
‘सहकारी संस्थे’ ची व्याख्या द्या. सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये विशद करा.
किंवा
‘नियंत्रणा’ ची व्याख्या द्या. नियंत्रणाचे महत्त्व विशद करा.