OMTEX AD 2

12th Commerce OCM Board Question Paper March 2022 - Organization of Commerce and Management Marathi Medium

Board Question Paper: March 2022 - Organization of Commerce and Management

बोर्ड प्रश्नपत्रिका : मार्च २०२२
वाणिज्य संघटन व व्यवस्थापन

वेळ: ३ तास एकूण गुण : ८०

सूचना:

(१) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
(२) उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात.
(३) डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवतात.
(४) प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी.
Maharashtra Board OCM Paper 2023
प्र.१. (अ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. [५]
(१) संघटनेच्या सदस्याला _______ कडून आदेश मिळाले पाहिजेत.
(अ) अनेक वरिष्ठ (ब) एका वरिष्ठ (क) सर्व वरिष्ठ
(२) व्यवस्थापनाची कार्ये _______ या कार्याने संपतात.
(अ) निर्देशन (ब) कर्मचारी व्यवस्थापन (क) नियंत्रण
(३) स्टार्ट अप इंडिया _______ चा पुढाकार आहे.
(अ) आर. बी. आय. (ब) भारत सरकार (क) जागतिक बँक
(४) योग्य वेळी कर भरणे ही संघटनांची _______ जबाबदारी आहे.
(अ) भागधारकांप्रति (ब) ग्राहकांप्रति (क) शासनाप्रति
(५) ऑनलाईन खरेदीदार वस्तूंची निवड करतो आणि _______ मध्ये टाकतो.
(अ) शॉपिंग मॉल (ब) शॉपिंग कार्ट (क) शॉपिंग बॅग

12th OCM Board Papers (March & July 2025)

(ब) खालील 'अ' गटातील शब्दांच्या 'ब' गटातील शब्दांसोबत योग्य जोड्या जुळवा. (५)
गट 'अ' गट 'ब'
(अ) कृषी पर्यटनाचा एक प्रकार (१) मूर्त स्वरूप
(ब) व्यवसाय सेवा (२) १९३०
(क) शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत (३) डिजिटल माध्यमांचा वापर
(ड) वस्तू विक्री कायदा (४) ग्रामीण पर्यटन
(इ) डिजिटल मार्केटिंग (५) हेनरी फेयॉल
(६) १९५६
(७) अमूर्त स्वरूप
(८) पारंपरिक माध्यमांचा वापर
(९) वैद्यकीय पर्यटन
(१०) एफ. डब्ल्यू. टेलर

12th OCM Board Papers (March & July 2024)

(क) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. (५)
(१) विकेंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकाराचे झालेले एकत्रीकरण.
(२) बँका अधिविकर्ष सवलत बचत खातेधारकांना उपलब्ध करून देतात.
(३) भारतात विक्रेते विखुरलेले असून ते असंघटित आहेत.
(४) KPO मध्ये कमी ज्ञान आणि विशेष कार्य समाविष्ट होतात.
(५) विमा व्यवसायातील धोके वाढवण्यास मदत करते.

12th OCM Board Papers (February & July 2023)

(ड) योग्य क्रम लावा. (५)
(१) नियंत्रण, संघटन, नियोजन
(२) अपघात, पॉलिसी घेणे, दावा
(३) मालाची मागणी नोंदवणे, वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन, नोंदणी
(४) जिल्हा न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
(५) प्रतवारी, बाजार नियोजन, वितरण

12th OCM Board Papers (2014 - 2022)

  • OCM - March 2022 English Medium: View
  • OCM - March 2022 Marathi Medium: View | Answer Key
  • OCM - July 2022 English Medium: View | Answer Key
  • OCM - March 2020 English Medium: View
  • OCM - March 2020 Marathi Medium: View | Answer Key
  • OCM - March 2019: View
  • OCM - July 2018: View
  • OCM - March 2018: View
  • OCM - July 2017: View
  • OCM - March 2017: View
  • OCM - July 2016: View
  • OCM - March 2016: View
  • OCM - July 2015: View
  • OCM - March 2015: View
  • OCM - October 2014: View
  • OCM - March 2014: View
प्र.२. खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार). [८]
(१) संघटन (२) विमा (३) ई-व्यवसाय (४) स्थान विपणी संज्ञा (५) लोक अदालत (६) बाह्य सेवा
प्र.३. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणतेही दोन). [६]
(१) अ. ब. क. कंपनीत श्री. पाटील त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात, तर दुसरीकडे श्री. जोशी हे संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात. श्री. दुबल हे व्यावसायिक संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात.
खालील कार्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची नावे सांगा.
(अ) संघटन (ब) निर्देशन (क) समन्वय
(२) श्री. राजाराम हे तरुण एम. एस. सी. ॲग्री पदवीधर आहेत. श्री. सीताराम हे वाणिज्य पदवीधर आहेत. श्री. राजाराम यांची त्यांच्या गावात कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची इच्छा आहे. श्री. सीताराम यांना खाजगी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करण्याची इच्छा आहे.
(अ) श्री. सीताराम यांची इच्छा काय आहे?
(ब) श्री. राजाराम यांची काय इच्छा आहे?
(क) श्री. सीताराम यांची शैक्षणिक पात्रता काय आहे?
(३) अजय www.amazon.com या वेबसाईटवरून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ऑनलाईन खरेदी करतो. त्याचवेळी संजय olx.com या वेबसाईटवरून जुनी मोटारसायकल खरेदी करतो.
तर खालील व्यवहार ओळखा.
(अ) C2C (सी टू सी) शी संबंधित वेबसाईट कोणती?
(ब) B2C (बी टू सी) शी संबंधित वेबसाईट कोणती?
(क) अजयने ऑनलाईन व्यवहार करताना कोणती पहिली अवस्था अनुकरण करावी?
प्र.४. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन). [१२]
(१) नियोजन व नियंत्रण
(२) जीवनविमा (आयुर्विमा) व अग्नी विमा
(३) जिल्हा आयोग व राष्ट्रीय आयोग
(४) कर्मचारी व्यवस्थापन व निर्देशन
प्र.५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन). [८]
(१) वस्तू विपणन मिश्रचे चार पी (4Ps) स्पष्ट करा.
(२) कर्मचाऱ्यांप्रति असणाऱ्या व्यवसायाच्या कोणत्याही चार सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा.
(३) ग्राहकांचे कोणतेही चार अधिकार / हक्क स्पष्ट करा.
प्र.६. खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) [८]
(१) व्यवस्थापनाची तत्त्वे लवचीक स्वरूपाची असतात.
(२) ग्राहक संरक्षणाच्या विविध पद्धती असतात.
(३) प्रत्यासनाचे तत्त्व हे नुकसान भरपाईच्या करारास लागू पडते.
(४) विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे.
प्र.७. खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन). [१०]
(१) हेनरी फेयॉल यांची व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्त्वे स्पष्ट करा.
(२) शासनाप्रति व्यवसायाच्या कोणत्याही पाच सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा.
(३) गोदामांचे प्रकार स्पष्ट करा.
प्र.८. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही एक). [८]
(१) बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा.
(२) विपणनाची कार्ये सविस्तर स्पष्ट करा.