Advertisement

Chapter 16.3: उपयोजित लेखन Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 16: उपयोजित लेखन

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.


विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.



SOLUTION

मागणी पत्र – (औपचारिक)

दिनांक: ४ जून २०१९

प्रति,

माननीय संचालक

हिरवाई ट्रस्ट,

बालोद्यान मार्ग,

तळेगाव दाभाडे.

विषय: 'वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.'

माननीय महोदय,

मी अ.ब.क, स्वामी दयानंद शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे. 'जागतिक पर्यावरण दिनानिमित्त' दिनांक ५ जून २०१९ रोजी हिरवाई ट्रस्ट 'झाडे लावा ... झाडे जगवा' हा उपक्रम राबवणार असल्याचे कळले. या उपक्रमात औषधी वनस्पतींच्या, फुलांच्या, फळांच्या रोपांचे मोफत वाटप होणार आहे. आमच्या स्वामी दयानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्याची आमची इच्छा आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आम्हांला खारीचा वाटा उचलायचा आहे.

यासाठी आपणाकडे उपलब्ध असलेल्या विविध रोपांचे प्रकारांनुसार प्रत्येकी ३ नग आपण पाठवून द्यावेत, जेणेकरून शाळेच्या परिसरात विविध झाडांची लागवड केली जाईल.

आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य उपक्रमात सहभागी करून घ्याल, अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत ही नम्र विनंती.

कळावे,

आपली विश्वासू,

अ.ब.क.

विद्यार्थी प्रतिनिधी

स्वामी दयानंद शाळा,

पेशवे रोड,

पुणे.

sdschool@xyz.com




विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


SOLUTION

दि. १० जून २०१९

प्रति,

मा. व्यवस्थापन,

हिरवाई ट्रस्ट,

बालोद्यान मार्ग,

तळेगाव - दाभाडे.

विषय - अभिनंदन करण्याबाबत.

महोदय,

सध्या जागतिक तापमानात सतत वाढ होत आहे. पर्यावरण असंतुलित आहे. या सर्वांचे दुष्परिणाम जाणवू लागले आहे. यावर उपाय म्हणजे भरपूर झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

या पार्श्वभूमीवर आपली हिरवाई ट्रस्ट "झाडे लावा..... झाडे जगावा" हे आपले ब्रीदवाक्य प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या रोपांचे मोफत वाटप करून लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे. आपल्या मोफत रोपे वाटप उपक्रमामुळे हजारो लोक ही रोपे घेऊन आपल्या परिसरात लावत आहेत. त्यामुळे उजाड, भकास परिसर हिरवंगार होत आहे.

आपला हा मोफत रोप वाटपाचा उपक्रम अभिनंदनास पात्र आहे. आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षकांच्या वतीने आपले मन:पूर्वक अभिनंदन. धन्यवाद.

आपला विश्वासू ,

अ. ब. क.

विद्यार्थी प्रतिनिधी,

चिकित्सक हायस्कुल,

खाडिलकर रोड,

गिरगाव मुंबई.




विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


SOLUTION

दिनांक: १९ एप्रिल २०१९

प्रति,

माननीय श्री. विनय गायकवाड

संचालक, विनय ॲकॅडमी

२, सोमवार पेठ, कराड.

विषय: 'मराठी सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याबाबत.'

माननीय महोदय,

मी अ.ब.क, इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून विनय ॲकॅडमीतर्फे आयोजित मराठी सुलेखन वर्गात प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे. मागच्या सुट्टीत मी आपले 'अ, आ, इ, ई' हे पुस्तक वाचून काढले. या पुस्तकात आपण सुलेखन कसे करावे याबद्दल सांगितले आहे, ते वाचून मी प्रेरित झालो.

'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असे म्हटले जाते. मलाही माझे अक्षर सुव्यवस्थित, नीटनेटके व वळणदार करण्याची इच्छा आहे, म्हणून १ मे ते ३१ मे या कालावधीत चालणाऱ्या आपल्या सुलेखन प्रशिक्षण वर्गात मला प्रवेश घ्यायचा आहे; पण येथे सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या खूप असल्यामुळे मला प्रवेश मिळणे जरा कठीण झाले आहे.

एक प्रामाणिक व इच्छुक विद्यार्थी म्हणून आपण या वर्गात मला प्रवेश द्यावा आणि आपल्या 'अक्षर' साधनेत सहभागी करून घ्यावे ही नम्र विनंती.

कळावे,

आपला विश्वासू

अ.ब.क.

३, साधना,

बुधवार पेठ, कराड.

abc@xyz.com




कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक -

(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -

(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -

(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-



SOLUTION

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक - प्रो. विशाल वाळके

(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -

योगासने व व्यायाम या दोहोंच्या माध्यमातून आपण निरोगी व निरामय आरोग्य प्राप्त करू शकतो. तीच आपल्या निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा अर्थ त्या ब्रीदवाक्यातून व्यक्त होतो. 

(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -

  • वातानुकूलित प्रशस्त जागा

  • सोईस्कर वेळा

  • आधुनिक सामग्री

  • तज्ज्ञ प्रशिक्षक

(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-

  • आरोग्य ही धनसंपदा आहे.

  • योगासने व व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.



दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन

आईस्क्रीम पार्लर

वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.



SOLUTION

भवानी आइसक्रीम पार्लर


कोणताही आनंद साजरा करण्यासाठी,

रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी,

अस्सल खाबूगिरी करण्यासाठी

कधीही भेट द्यावं असं

हक्काचं ठिकाण!

आमची वैविध्यपूर्ण उत्पादने:

  • मस्तानी

  • मटका कुल्फी

  • मलाई कुल्फी

  • हॉट आइसक्रीम

  • चिल्ड आइसस्टिक

  • मिश्ती दोई (बंगाली डिश)

  • चॉकेलेट मूझ

गिफ्ट पॅक्स उपलब्ध

आकर्षक सवलती

शुद्धता व ताजेपणाची हमा

लवकर भेट द्या...

भवानी आइसक्रीम पार्लर

रिमझिम मॉल,

सानपाडा दादर.

संपर्क -

bhavaniicecreame@gmail.com

- xxxxxxx 



शब्दांवरून जाहिरात लेखन:

प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग

ग्राहक समाधान

वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.



SOLUTION

सफारी

प्रवासी मनांचे सोबती!

कुठेही जा ... सहलीला, गावाला, फिरायला,

गिर्यारोहण करायला एवढेच काय, तर

लोकलच्या रोजच्या गर्दीच्या प्रवासातही

सोबत असावी अशी सफारी प्रवासी बॅग!


वैशिष्ट्ये:

  • मजबूत व टिकाऊ कापड

  • सुंदर व आकर्षक रंगसंगती

  • वाजवी दर

  • गरजेनुसार वैविध्यपूर्ण बॅग्जचा खजिना

ग्राहक समाधान हेच आमचे ध्येय!

आजच संपर्क साधा:

सफारी

४, रावल पाडा

रानडे रोड, पुणे

संपर्क- 

- safari152@gmail.com

- xxxxxxxxxxx



खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.



SOLUTION

जनसत्ता

वसुंधरा दिन उत्साहात साजरा

'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण

कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न

दि. १६ जून २०१८

आमच्या प्रतिनिधीकडून,

दिनांक १५ जून २०१८ रोजी साधना विद्यालयाच्या वतीने 'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वनाधिकारी मा. श्री. सुरज राव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थीवर्गासोबत ते स्वत: वृक्षदिंडीत सहभागी झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे त्यांनी 'वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या समारोपसमयी पाहुण्यांसह सर्व उपस्थितांना एकेक तुळशीचे रोप देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले. या अनोख्या आभार 'भेटीचे' संवर्धन प्रत्येकाने करावे यासाठी सामूहिक शपथविधी झाला आणि हा सोहळा संपन्न झाला.



रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


SOLUTION

लोकपत्र

रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित!

प्रवासात स्वओळखपत्र बाळगणे अनिवार्य

दि. २८ जानेवारी २०१८

आमच्या वार्ताहराकडून

               सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी काल मुंबई येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले. स्वओळखपत्र ही प्रवाशांची ओळख आहे. गेल्या वर्षभरात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हा नियम तातडीने लागू करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे ते म्हणाले. आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक स्वओळखपत्र म्हणून रेल्वे प्रवाशांनी नेहमी स्वत:जवळ बाळगावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.



खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ....



SOLUTION

अपूर्व भेट

...आजीने आवाजाच्या दिशेने पाहिले, तर एक गोरापान, तेजस्वी तरुण तिच्याजवळ आला. त्याने तिला वाकून नमस्कार केला. ’जिजी, ओळखलंस मला?“ आजीने त्याला क्षणभर न्याहाळले आणि म्हणाली, ’तुला रे कोण विसरणार विजू!“ तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित सुखद भाव तरळत होते. दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली होती.

हा विजू म्हणजे खूप वर्षांपूर्वी आजीच्या घराशेजारीच राहणाऱ्या वसुधाकाकूंचा मुलगा. त्याच्या लहानपणीच वसुधाकाकूंचे निधन झाले. त्याचे वडील कामानिमित्त बाहेर असायचे. संपूर्ण दिवस हा लहानगा विजू आजीच्या घरीच असायचा. आजीने अगदी त्याचा मुलासारखा सांभाळ केला. रोज सकाळी त्याचे वडील कामावर गेले, की हा आजीजवळ यायचा. मग याचा अभ्यास, नाश्ता करून घेणे, तो वेळेवर शाळेत जाण्यासाठी डबा, पाणी भरून देणे ही कामे आजी अगदी तत्परतेने करत असे. संध्याकाळी शाळेतून घरी परतताना विजू गल्लीच्या बोळापासून ओरडत यायचा, ’जिजी, मी आलो गं!“

अचानक विजूच्या वडिलांची बदली परदेशी झाली, अगदी कायमची! आपल्याला जीव लावणाऱ्या हृदयाच्या तुकड्याचा निरोप घेताना आजीच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. मनावर दगड ठेवून तिने विजूला निरोप दिला. त्यानंतरच्या काळात वडील त्यांच्या कामात तर विजू आपल्या अभ्यासात, छंदवर्गात, मित्रांत व्यस्त असल्याने इकडचा काहीही संपर्क आला नव्हता. मधल्या कित्येक वर्षांचा हा काळ झरझर उडून गेला होता आणि आज अचानक विजू तिच्या भेटीला आला होता.

आजी खूपच आनंदित झाली. तिने विजूला जवळ घेतले. विजूनेही आपल्या जिजीकरता सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या. हे सर्व पाहून आजी हरखून गेली. हे अनोखे प्रेम पाहून सर्वांनाच गहिवरून आले. या वयात आनंदाच्या कारंज्याप्रमाणे इतरांत उल्हास भरणाऱ्या आजीला दीर्घायुष्य लाभो, म्हणून मी मनोमन प्रार्थना केली.

तात्पर्य: मनापासून जुळलेली नाती कायम टिकून राहतात.



खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  →

दप्तर  →

गृहपाठ  →

रस्ता



SOLUTION

अनोखी मैत्री

विजय आणि अजय खूप चांगले मित्र होते. ते रोज एकत्र शाळेत जात, एकत्र अभ्यास करत, एकत्र खेळत. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलत नसे.

एकदा काय झाले, विजयची गृहपाठाची वही चुकून हरवली. विजय प्रचंड घाबरला कारण दुसऱ्या दिवशी वर्गशिक्षिका सर्व विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासणार होत्या. अजयलाही फार वाईट वाटले. दोघांनी आपापली दप्तरे पुन्हापुन्हा तपासली; पण वही मिळालीच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी जड पावलांनी दोघे शाळेत पोहोचले. पहिल्याच तासाला वर्गशिक्षिकांनी गृहपाठ वह्या बाकावर काढून ठेवायला सांगितल्या. वर्गशिक्षिका प्रत्येक बाकावरील वही तपासत होत्या. त्या विजयच्या बाकाजवळ जाण्याआधीच अजयने आपली वही विजयच्या बाकावर ठेवली. विजयची सुटका झाली. अजयला मात्र पन्नास उठाबशा आणि हातावर दोन छड्या मिळणार हे पाहून विजय रडवेला झाला. त्याने वर्गशिक्षिकांना सर्व सत्य सांगितले. अजयचे विजयवरचे प्रेम पाहून त्याही क्षणभर अवाक् झाल्या. अजयने विजयसाठी केलेला त्याग विजयच्या प्रामाणिकपणाइतका खरा होता. त्यांनी या दोन्ही लेकरांना पोटाशी धरले.

आज संध्यावळी घरी परतताना तो वळणावळणाचा रस्ता विजय-अजयच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहून खुद्कन हसला. घर जवळ येताच विजय अजयला ओढत ओढत घरी घेऊन गेला ते आईला आजची अनोखी गोष्ट सांगण्यासाठी! पाहतो तर काय, आई वही घेऊन चक्क दारात उभी! ’गडबडीत कपाटाच्या खाली सारून गेलास वही! विजय, किती हा वेंधळेपणा!“ दोघा मित्रांनी एकमेकांकडे पाहिले. ते खुद्कन हसले. मग मात्र आईला आपल्या जिवलग मित्राच्या अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगण्यासाठी विजय पुढे सरसावला.

तात्पर्य: जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र.




पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.


SOLUTION

अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ

दिनांक २२ डिसेंबर ... हो, याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम होता. आम्ही सर्व मित्रमंडळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आमच्या लाडक्या मित्राचे – आनंदचे अभिनंदन करण्याकरता अर्धा तास आधीच शाळेच्या पटांगणावर जमलो.

कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांचे व अध्यक्षांचे स्वागत मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. स्वागतगीत, ईशस्तवन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यानंतर आम्हांला प्रतीक्षा होती त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय, आंतरशालेय स्पर्धांतील पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांची नावे घेतली जाऊ लागली, तसतसे ते ते विद्यार्थी आपल्या आसनावरून उठून बक्षीस घेऊन येऊ लागले. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

आणि अचानक एक क्षण पटांगणावर शांतता पसरली. मुख्याध्यापक व्यासपीठावरून उठले आणि त्यांनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या शाळेची कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आनंदविषयी कौतुकोद्गार काढत त्याला व्यासपीठावर बोलावले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. आम्ही मित्रही आमच्या आनंदला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या व शाळेच्या नावाने आरोळ्या ठोकत होतो. ज्या क्षणी सन्मानचिन्ह देऊन आनंदचा गौरव केला गेला तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला.

इतका सन्मान मिळूनही आनंदचे पाय मात्र जमिनीवरच होते. बक्षीस स्वीकारल्यानंतर आभार मानण्यासाठी माईक हातात धरून तो बोलू लागला. वास्तविक, अत्यंत कष्टमय परिस्थितीतून त्याने हे यश संपादन केले होते; पण त्या कष्टांचा अजिबात बाऊ न करता किंवा स्वत:च्याच मुखाने स्वत:च्या मेहनतीचे पाढे न वाचता आनंदने आपल्या आईचे, शिक्षकांचे, आम्हां मित्रांचे आभार मानले. आपल्या यशाचे सारे श्रेय त्याने अशाप्रकारे सर्वांत वाटून टाकले. तितक्याच नम्रतेने सर्व प्रमुख पाहुणे, व्यासपीठ व उपस्थितांना लवून नमस्कार करून तो जेव्हा खाली उतरला तेव्हा त्याच्या या गुणाचे कौतुक खुद्द प्रमुख पाहुण्यांनी केले. हा लाडका मित्र भविष्यातही अशीच प्रगती करत राहावा ही सदिच्छा मनाशी बाळगत आम्ही कार्यक्रम संपताच घरी परतलो.



नमुना कृती.




SOLUTION

मी क्रीडांगण बोलत आहे...

’काय दोस्ता, आलास? परीक्षा संपली वाटतं? तुम्ही सर्व आलात की कसं बरं वाटतं! त्यानिमित्ताने का होईना, माझ्यावर टाकलेले दगड-धोंडे, कचरा दूर केला जातो. तुमच्या किलबिलाटाने, दंगामस्तीने मी गजबजून जातो, आनंदून जातो.

सकाळची कोवळी उन्हे घेण्यासाठी, दुपारी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी, संध्याकाळी मित्रमैत्रिणींसोबत खेळण्यासाठी, रात्री फेरफटका मारण्यासाठी जेव्हा तुम्ही माझ्याजवळ येता तेव्हा मला खूप आनंद होतो. पावसात तुम्ही इथे चिखलात फुटबॉल खेळायला येता, डबक्यातल्या पाण्यात होड्या सोडता, माझ्यावर दणादण उड्या मारता तेव्हा माझंही मन ओलंचिंब होऊन जातं. तुम्ही नसलात, की नुसता शुकशुकाट असतो. मग काय, कुठल्या राजकारण्याची सभा किंवा साखरपुड्यासाठी, सणाकार्यक्रमांसाठी लोक माझा वापर करण्याची संधी सोडत नाहीत; पण खरं सांगू का? मला खेळासाठीचं हक्काचं अंगण म्हणूनच जर तुम्ही मान दिलात, तरच मला जन्म सार्थकी लागल्यासारखा वाटेल.

आज मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलांना मोबाइल, संगणकामधील यांत्रिक खेळ खेळण्यात अधिक रस वाटत आहे. लहान वयातच लठ्ठपणा, मानदुखी, डोळ्यांच्या विकारांना आयतं आमंत्रण मिळालं आहे. शिवाय, माझ्यापेक्षा टीव्हीचा वाढता प्रभाव आहेच. तासनतास मनोरंजनाच्या या 'इडियट बॉक्स' समोर बसून आपला वेळ वाया घालवणाऱ्या, तळलेले, खारट पदार्थ खात डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा सावरणाऱ्या माझ्या दोस्तांना पाहून मला खूप वाईट वाटतं; पण माझा नाइलाज आहे रे. आपल्या व्यस्त जीवनक्रमांतून खेळण्यासाठी वेळ काढणे त्यांना कठीणच होऊन बसले आहे.

हल्ली टोलेजंग इमारती बांधणारे विकासक आमच्यावर अतिक्रमण करून त्याजागी भलेमोठे घरांचे प्रकल्प उभारत आहेत. आमची जागा हळूहळू दुकाने, मॉल्स उभारण्याकरता विकली जात आहे. प्रगतीच्या नावाखाली आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हे जर असेच चालू राहिले, तर भविष्यात मुले खेळणार कुठे?

जर तुम्ही खेळलात, तर मी टिकून राहीन. नाहीतर माझे अस्तित्वच नष्ट होईल किंवा खेळांडूपुरतेच माझे अस्तित्व मर्यादित राहील, म्हणून सांगतो, रोज खूप खेळा... माझ्याजवळ या...या चिमण्यांनो, परत फिरा... याल ना?“





SOLUTION

झाडे लावा झाडे जगवा

'वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे!' खरेच, निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगेसोयरेच असतात; कारण, झाडांमुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो. चांगला पाऊस पडला, की शेतीभाती पिकते. परिणामी, पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, पाणी उपलब्ध होते. झाडांची मुळे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. ती माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (भूजल पातळी) वाढते. जलचक्र सुरळीत चालते. झुडूप, वेली, रोपटी, वृक्ष इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते. हिरव्यागार झाडांमुळे जणू सृष्टीने हिरवा शालू नेसला आहे असे वाटते. वातावरण प्रफुल्लित होते.

मानवी जीवनातही झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर करून मानव रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवतो. शेंड्यापासून मुळापर्यंत झाडांचे सर्व भाग मानवाच्या उपयोगी पडतात. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा झाडांमुळेच भागवल्या जातात. झाडांपासून कागदनिर्मिती घडते. झाडे मानवाला जीवनदर्शन घडवतात. त्यांना तोडनाऱ्यांनाही ती फळेच देतात. त्यांची परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगातही खंबीर राहण्याची अचल वृत्ती आपण जीवनात कसे जगावे याचे पाठ देतात. झाडांचे अस्तित्व मानवात उत्साह भरते, हिरवाई चैतन्य निर्माण करते. झाडे असतील, तर तेथे पशुपक्षी राहतात. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने, प्राण्यांच्या अस्तित्वाने वातावरण प्रसन्न होते. झाडांच्या सावलीत थकलाभागला वाटसरू विश्रांती घेत असतो. कडक उन्हाच्या झळा कमी करून वातावरणात गारवा टिकवण्याचे काम झाडे करतात.

परंतु, आज मानवाच्या हव्यासापायी निसर्गाचे पावलोपावली शोषण घडत आहे. शहरीकरणाच्या, प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. लागवाडीखालची जमीन, वनराया नष्ट करून तेथे इमारती, गृहप्रकल्प उभारले जात आहेत. परिणामी, नैसर्गिक संपत्तीचा, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होत चालला आहे. त्यातून अवकाळी पाऊस, जागतिक तापमानवाढ, हिमनग वितळणे, त्सुनामी, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक समस्या वाढत चालल्या आहेत.

हा नाश जर थांबला नाही, तर तो संपूर्ण सृष्टीच्या विनाशाला आमंत्रण देईल. झाडे नसतील, तर डोंगर उघडेबोडके पडतील. वातावरण भकास होईल. जमिनीची धूप वाढेल. दुष्काळ, पूर, अतिवृष्टी असे बदल निसर्गात घडू लागतील. प्राणीपक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होतील. त्यामुळे, त्यांची संख्या घटेल. हिंस्र, जंगली प्राणी मनुष्यवस्तीत शिरून मानवांचा फडशा पाडतील. सर्वत्र हाहाकार माजेल.

हा सर्व ऱ्हास थांबवण्यासाठी 'झाडे लावा झाडे जगवा' हा मूलमंत्र 'जीवनमंत्र' बनवणे गरजेचे आहे. वृक्षदिंडी काढून, नारे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. याउलट, प्रत्येक मानवाने पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही उत्पादने वापरण्यावर भर दिला पाहिजे. दरमाणशी किमान एक तरी झाड लावले गेले पाहिजे व लावलेल्या झाडाचे आजन्म संगोपन केले पाहिजे.

परिवारातील एका सदस्याप्रमाणे स्वत: लावलेल्या झाडाची जबाबदारी आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आरक्षित वनक्षेत्रे, वनराया यांच्या संवर्धनासाठीचे सुधारित कायदे, नियम अंमलात आणले गेले पाहिजेत.

'एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या मंत्राने सर्वांनी एकत्र येऊन वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन व वृक्षसंगोपनाची मोहीम राबवली तरच ही सृष्टी नंदनवन बनेल.

चला तर मग, प्रतिज्ञा करू,

'जगवू झाडे, लावू झाडे मंत्र जपू सारे।


PDF FILE TO YOUR EMAIL IMMEDIATELY PURCHASE NOTES & PAPER SOLUTION. @ Rs. 50/- each (GST extra)

SUBJECTS

HINDI ENTIRE PAPER SOLUTION

MARATHI PAPER SOLUTION

SSC MATHS I PAPER SOLUTION

SSC MATHS II PAPER SOLUTION

SSC SCIENCE I PAPER SOLUTION

SSC SCIENCE II PAPER SOLUTION

SSC ENGLISH PAPER SOLUTION

SSC & HSC ENGLISH WRITING SKILL

HSC ACCOUNTS NOTES

HSC OCM NOTES

HSC ECONOMICS NOTES

HSC SECRETARIAL PRACTICE NOTES

2019 Board Paper Solution

HSC ENGLISH SET A 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET B 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET C 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET D 2019 21st February, 2019

SECRETARIAL PRACTICE (S.P) 2019 25th February, 2019

HSC XII PHYSICS 2019 25th February, 2019

CHEMISTRY XII HSC SOLUTION 27th, February, 2019

OCM PAPER SOLUTION 2019 27th, February, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION COMMERCE, 2nd March, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION SCIENCE 2nd, March, 2019

SSC ENGLISH STD 10 5TH MARCH, 2019.

HSC XII ACCOUNTS 2019 6th March, 2019

HSC XII BIOLOGY 2019 6TH March, 2019

HSC XII ECONOMICS 9Th March 2019

SSC Maths I March 2019 Solution 10th Standard11th, March, 2019

SSC MATHS II MARCH 2019 SOLUTION 10TH STD.13th March, 2019

SSC SCIENCE I MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 15th March, 2019.

SSC SCIENCE II MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 18th March, 2019.

SSC SOCIAL SCIENCE I MARCH 2019 SOLUTION20th March, 2019

SSC SOCIAL SCIENCE II MARCH 2019 SOLUTION, 22nd March, 2019

XII CBSE - BOARD - MARCH - 2019 ENGLISH - QP + SOLUTIONS, 2nd March, 2019

HSC Maharashtra Board Papers 2020

(Std 12th English Medium)

HSC ECONOMICS MARCH 2020

HSC OCM MARCH 2020

HSC ACCOUNTS MARCH 2020

HSC S.P. MARCH 2020

HSC ENGLISH MARCH 2020

HSC HINDI MARCH 2020

HSC MARATHI MARCH 2020

HSC MATHS MARCH 2020


SSC Maharashtra Board Papers 2020

(Std 10th English Medium)

English MARCH 2020

HindI MARCH 2020

Hindi (Composite) MARCH 2020

Marathi MARCH 2020

Mathematics (Paper 1) MARCH 2020

Mathematics (Paper 2) MARCH 2020

Sanskrit MARCH 2020

Sanskrit (Composite) MARCH 2020

Science (Paper 1) MARCH 2020

Science (Paper 2)

Geography Model Set 1 2020-2021


MUST REMEMBER THINGS on the day of Exam

Are you prepared? for English Grammar in Board Exam.

Paper Presentation In Board Exam

How to Score Good Marks in SSC Board Exams

Tips To Score More Than 90% Marks In 12th Board Exam

How to write English exams?

How to prepare for board exam when less time is left

How to memorise what you learn for board exam

No. 1 Simple Hack, you can try out, in preparing for Board Exam

How to Study for CBSE Class 10 Board Exams Subject Wise Tips?

JEE Main 2020 Registration Process – Exam Pattern & Important Dates


NEET UG 2020 Registration Process Exam Pattern & Important Dates

How can One Prepare for two Competitive Exams at the same time?

8 Proven Tips to Handle Anxiety before Exams!

BUY FROM PLAY STORE

DOWNLOAD OUR APP

HOW TO PURCHASE OUR NOTES?

S.P. Important Questions For Board Exam 2022

O.C.M. Important Questions for Board Exam. 2022

Economics Important Questions for Board Exam 2022

Chemistry Important Question Bank for board exam 2022

Physics – Section I- Important Question Bank for Maharashtra Board HSC Examination

Physics – Section II – Science- Important Question Bank for Maharashtra Board HSC 2022 Examination

Important-formula



THANKS