Chapter 14: बीज पेरले गेले

कारणे लिहा

लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण...

लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण लेखकाच्या वडिलांची बदली झाली होती; पण आपल्या मुलाने चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी लेखकाच्या आई-वडिलांनी त्यांना सोबत नेले नाही.

लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली, कारण...

लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली, कारण लेखक ज्या चुलत्यांकडे राहत असत ते चुलते पुण्याच्या वाय. एम. सी. ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत होते व त्या संस्थेत अनेक लोक खेळायला येत असत.

‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण...

‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ग्राऊंडवर लवकर आलेले खेळाडू लेखकाला चेंडू फेकायला बोलवत तेव्हा आपली आवड प्रत्यक्ष खेळुन पूर्ण करता येते हे पाहून 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन' असे लेखकाला वाटले.

दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण...

दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण लेखकाचे वडील पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत असल्यामुळे मुलांसाठी खेळणी घेणे त्यांना शक्य नव्हते.

आकृती पूर्ण करा

लेखकाच्या काळजाला भिडलेले दृश्य

मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी उडणारी झिम्मड

लेखकाचा बालपणीचा दिनक्रम
  1. गल्लीतील मुलांना जमवून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे
  2. पतंग उडवणे
  3. कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे
  4. कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा मनसोक्त स्वाद घेणे
  5. घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांमधून बॅट व स्टंप तयार करून जुना बॉल मिळवून क्रिकेट खेळने.

ओघतक्ता तयार करा

लाजेने मान खाली
लेखकाने आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या.
सर्वांच्या डोळ्यांत कौतुकाचे भाव उमटले.
लेखकाचे नाव मोठ्या अक्षरांमध्ये शाळेच्या बोर्डावर झळकले.
विद्यार्थी व शिक्षकांनी लेखकाला शाबासकीची थाप दिली.
अभिमानाने मान वर

खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा

सही

स्वाक्षरी

निवास

घर

क्रीडा

खेळ

प्रशंसा

स्तुती

खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा

मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.

  • आनंद गगनात न मावणे
  • हेवा वाटणे
  • खूणगाठ बांधणे
  • नाव उज्ज्वल करणे

दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.

  • आनंद गगनात न मावणे
  • हेवा वाटणे
  • खूणगाठ बांधणे
  • नाव उज्ज्वल करणे

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.

  • आनंद गगनात न मावणे
  • हेवा वाटणे
  • खूणगाठ बांधणे
  • नाव उज्ज्वल करणे

मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.

  • आनंद गगनात न मावणे
  • हेवा वाटणे
  • खूणगाठ बांधणे
  • नाव उज्ज्वल करणे

पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा

लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग 'बीज पेरले गेले' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

लेखक चंदू बोर्डे यांचा जन्म पुण्यात गरीब कुटुंबात झाला. लेखकाचे आई-वडील दोघेही कडक शिस्तीचे होते. लेखकाबद्दल एखादी तक्रार आल्यास त्यांना योग्य ती शिक्षा वेळीच देण्याचे काम ते करत. आपल्या बदलीमुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, म्हणून मुलांना त्यांनी पुण्यातच ठेवले. लेखकाने एकदा शाळा चुकवून क्रिकेटचा सामना बघितल्याचे कळताच त्यांचे वडील संतापले व त्यांनी लेखकाला छड्या मारत शाळेत नेऊन बसवले. त्यानंतर शाळा चुकवण्याची हिंमत लेखकाने कधीही केली नाही. एकंदरीतच आपल्या वडिलांच्या कडक शिस्तीमुळे लेखकाने अभ्यास व खेळ या दोन्ही गोष्टी सांभाळल्या व आपल्या आयुष्यात यश प्राप्त केले.

तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.

वडिलांच्या बदलीमुळे लेखकाला पुण्यात काकांकडे राहावे लागले. काका राहत असलेली संस्था खेळासाठी प्रसिद्ध असल्याने तेथे येणाऱ्या अनेक खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी लेखकाला मिळाली. अधिक खेळायला मिळावे, म्हणून लवकर येणाऱ्या खेळाडूंना चेंडू फेकण्यासाठी लेखक उत्साहाने जात असत. खेळाडूही त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून मुद्दाम आऊट होत. लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात व लगेच उचलून फेकण्यात त्यांना समाधान वाटे. आपणही या खेळाडूंप्रमाणे खेळावे, ही इच्छा लेखकाच्या मनात येई. आपणही क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी पक्के ठरवले. अशाप्रकारे, क्रिकेट पाहता पाहता, खेळण्यात सहभागी होता होता लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजले.

तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.

लेखकाची खेळाची आवड पुण्यात असताना वाय. एम. सी.ए. मध्ये जोपासली गेली. तिथे खेळणाऱ्या अनेक खेळांडूना पाहून त्यांच्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले. प्रसिद्ध खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी लोकांची होणारी गर्दी पाहून लेखकाच्या मनात आपणही मोठे खेळाडू व्हावे आणि आपल्या भोवतीही लोकांनी स्वाक्षरीसाठी गर्दी करावी अशी इच्छा निर्माण झाली. त्यांनी स्वाक्षरीच्या तालमींनाही सुरुवात केली. आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करताना त्यांनी आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या आणि विद्यार्थी व शिक्षकांची शाबासकी मिळवली. अशाप्रकारे, लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज उगवले असावे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.

प्रतिकूल परिस्थिती सांगून बदलत नसते. त्यामुळे, माणसाने आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यामध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक असते. त्याकरता 'संयम' व 'शांतवृत्ती' हे गुण अतिशय आवश्यक ठरतात. परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवण्यासाठी विचारांची लवचीकता आवश्यक असते. 'मेहनत' व 'एकाग्रता' या गुणांनी आपण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करू शकतो. बऱ्याच वेळा प्रतिकूल परिस्थिती मानवाचा आत्मविश्वास नाहीसा करते. अशा वेळी नेहमी आशावादी राहून लवकरच अनुकूल स्थिती येईल असा विश्वास ठेवावा. अशाप्रकारे, प्रतिकूल परिस्थितीशी लढा देण्याकरता सामर्थ्य, सहनशीलता, लढाऊ वृत्ती, संयम व आशावाद हे गुण आवश्यक ठरतात.