Sunday, July 10, 2016

Kribakari bandarinatha
एका वाक्यात उत्तरे द्या :

१. संत नरहरी सोनार यांनी दीनानाथ कोणास म्हटले आहे?
उ. संत नरहरी सोनार यांनी पांडुरंग विठ्ठलाला दीनानाथ म्हटले आहे. 

२. संत नरहरी सोनारांच्या मते पांडुरंग कोणाला क्षमा करतो?
उ. संत नरहरी सोनारांच्या मते पांडुरंग माणसाच्या अपराधांना क्षमा करतो. 

५०-६० शब्दांत उत्तरे द्या : 

१. पंढरीनाथांचा महिमा संत नरहरी सोनारांनी कसा वर्णिला आहे?
उ. संत नरहरी सोनार पंढरीनाथ पांडुरंगाचा महिमा सांगताना म्हणतात की विठ्ठल सर्व अपराधांना क्षमा करतो. भक्तांना सांभाळतो, अनाथांना आसरा देतो. ते स्वतःला आणि एकूण मानवजातीला अन्यायी म्हणतात आणि विठ्ठलाने क्षमा करावी अशी प्रार्थना करतात. संत नरहरी सोनार म्हणतात की पांडुरंगाची दया आणि कृपादृष्टी सागरासारखी अनंत आहे.