SSC इतिहास आणि राज्यशास्त्र (N 727) उत्तरांसह - २०२५
इतिहास (History)
प्र. १ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
प्र. १ (ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा:
i. मल्लखांब — शारीरिक कसरतीचे खेळ
ii. वॉटर पोलो — पाण्यातील खेळ
iii. स्केटींग — साहसी खेळ
iv. बुद्धिबळ — मैदानी खेळ
दुरुस्त जोडी: बुद्धिबळ — बैठे खेळ (इनडोअर गेम)
i. लाल किल्ला — मुंबई
ii. जंतर मंतर — जयपूर
iii. राणी-की-बाव — पाटण
iv. कॅपिटल कॉम्प्लेक्स — चंदीगढ
दुरुस्त जोडी: लाल किल्ला — दिल्ली
i. पंडिता रमाबाई — द हाय कास्ट हिंदू वुमन
ii. रखमाबाई — भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर
iii. ताराबाई शिंदे — हू वेअर द शूद्राज
iv. मीरा कोसंबी — स्त्रीवादी लेखन (Feminist Essays)
दुरुस्त जोडी: ताराबाई शिंदे — स्त्रीपुरुष तुलना (टीप: 'हू वेअर द शूद्राज' हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे)
प्र. २ (अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणत्याही दोन):
| १. उत्तर भारत | कथक |
| २. महाराष्ट्र | लावणी |
| ३. तमिळनाडू | भरतनाट्यम |
| ४. केरळ | कथकली |
प्र. २ (ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन):
उत्तर: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी 'महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा'ची स्थापना केली. या मंडळामार्फत 'मराठी विश्वकोश' निर्मितीस चालना देण्यात आली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुख्य संपादक म्हणून नेमणूक झाली. विश्वकोशामुळे समाजाचा बौद्धिक व सांस्कृतिक विकास होतो आणि कुतूहल शमवले जाते.
उत्तर: 'उपयोजित इतिहास' या संज्ञेसाठी 'जनांसाठी इतिहास' (Public History) असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो. भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान वर्तमानातील आणि भविष्यकाळातील समस्या सोडवण्यासाठी कसे उपयोगी पडेल, याचा विचार या विषयात केला जातो. वर्तमानकाळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान उपयुक्त ठरते.
उत्तर: प्रसारमाध्यमांमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख, लेख लिहिणारे लेखक, बातमीदार, संपादक यांची गरज असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये (टीव्ही) अँकर्स, तंत्रज्ञ, कॅमेरामन यांची आवश्यकता असते. तसेच ऐतिहासिक मालिका किंवा चित्रपटांसाठी इतिहास तज्ज्ञांची सल्लागार म्हणून गरज असते.
प्र. ३ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन):
कारण: ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू यांचे जतन करताना विशिष्ट रासायनिक प्रक्रियांची गरज असते. वस्तू हाताळताना कोणती काळजी घ्यावी, याचे ज्ञान असावे लागते. चुकीच्या पद्धतीमुळे ऐतिहासिक ठेव्याचे नुकसान होऊ शकते. म्हणून, या कामासाठी योग्य प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचीच आवश्यकता असते.
कारण: सीमाँ द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडली. त्यामुळे इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. स्त्रियांच्या रोजगाराच्या संधी, ट्रेड युनियन्समधील त्यांचे स्थान, कौटुंबिक जीवन यांसारख्या विविध पैलूंवर सखोल संशोधन करण्यास सुरुवात झाली.
कारण: 'बखर' हा मध्ययुगीन महाराष्ट्रातील इतिहास लेखनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया आणि थोरांचे चरित्र यांचे वर्णन असते. तत्कालीन राजकीय घडामोडी आणि सामाजिक जीवन समजून घेण्यासाठी बखर उपयुक्त ठरते.
कारण: लोकशाही बळकट होण्यासाठी जनतेला माहिती मिळणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांमुळे सरकारी धोरणे आणि देशातील घटना लोकांपर्यंत पोहोचतात. यामुळे जनजागृती होते आणि लोकशाही प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढतो. म्हणूनच, माहितीचा मुक्त प्रवाह सर्व थरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमे आवश्यक असतात.
प्र. ४ दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
विषय: पुस्तकांचे गाव - भिलार
(१) पुस्तकांच्या गावाचे नाव सांगा.
उत्तर: भिलार.
(२) महाराष्ट्र शासनाचे कोणता प्रकल्प राबविला आहे?
उत्तर: महाराष्ट्र शासनाने 'पुस्तकांचे गाव' हा प्रकल्प राबविला आहे.
(३) पुस्तकांच्या गावाविषयी आपले मत मांडा.
उत्तर: 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळते आणि वाचन संस्कृती रुजण्यास मदत होते. भिलार गावातील प्रत्येक घरात पर्यकांसाठी ग्रंथालय उघडून देणे हे महाराष्ट्राच्या साहित्यीक वारश्याचे जतन करण्याचे एक उत्तम उदाहरण आहे.
प्र. ५ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन):
उत्तर: कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित इतिहासलेखनास 'मार्क्सवादी इतिहासलेखन' म्हणतात.
१. यात उत्पादनाची साधने, पद्धती आणि मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
२. सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे हे याचे मुख्य सूत्र आहे.
३. भारतात दामोदर कोसंबी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा यांनी या पद्धतीचा प्रभावी वापर केला.
४. हे लेखन राजकीय इतिहासलेखनापेक्षा आर्थिक आणि सामाजिक बदलांवर अधिक भर देते.
उत्तर: दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील कोकण आणि गोवा भागातील लोकनाट्याचा प्रकार आहे.
१. यात विष्णूच्या दहा अवतारांचे (मत्स्य ते कल्की) सादरीकरण केले जाते.
२. नाटकाची सुरुवात सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करून करतो.
३. पात्रांचा अभिनय, रंगभूषा आणि वेशभूषा पारंपरिक पद्धतीची असते (उदा. लाकडी मुखवटे).
४. ही नाटके मराठी रंगभूमीची पूर्वपीठिका मानली जातात.
उत्तर: खेळ आणि इतिहास यांचा घनिष्ठ संबंध आहे:
१. खेळांची उत्पत्ती आणि विकास समजून घेण्यासाठी इतिहासाची मदत घ्यावी लागते (उदा. ऑलिम्पिक).
२. खेळांचे समालोचन (Commentary) करण्यासाठी समीक्षकाला खेळाचा इतिहास, जुने विक्रम आणि आकडेवारी माहीत असावी लागते.
३. खेळांवर आधारित चित्रपट (उदा. लगान, दंगल) बनवताना त्या काळातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी इतिहास गरजेचा असतो.
४. खेळाडूंची चरित्रे लिहिण्यासाठी देखील इतिहास संशोधनाची गरज असते.
उत्तर:
१. भारतात १९२४ मध्ये 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' (IBC) नावाने पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
२. ब्रिटिश सरकारने याचे नामकरण 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस' (ISBS) आणि नंतर १९३६ मध्ये 'ऑल इंडिया रेडिओ' (AIR) असे केले.
३. स्वातंत्र्यानंतर, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून याला 'आकाशवाणी' हे नाव देण्यात आले.
४. आकाशवाणीवरून शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम सादर केले जातात. 'विविध भारती' ही सेवा लोकप्रिय आहे.
राज्यशास्त्र (Political Science)
प्र. ६ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
प्र. ७ पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन):
उत्तर: बरोबर.
कारण: राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे शासनाची धोरणे व योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
उत्तर: बरोबर.
कारण: नक्षलवादी (डाव्या उग्रवादी) चळवळीची सुरुवातच भूमीहीन शेतकरी आणि आदिवासी यांच्यावरील अन्यायाविरुद्ध झाली होती. जरी या चळवळीने हिंसक वळण घेतले असले, तरी आजही शेतकरी व आदिवासींचे हक्क हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे.
उत्तर: बरोबर.
कारण: भारतीय संविधानाने स्त्रियांना समान हक्क दिले आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा यांसारख्या कायद्यांमुळे स्त्रियांना संरक्षण मिळाले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने आरक्षण देऊन त्यांना राजकीयदृष्ट्या सक्षम केले आहे.
प्र. ८ (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतीही एक):
उत्तर: प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी २००५ मध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. यामुळे नागरिकांना सरकारकडून माहिती मिळवण्याचा हक्क मिळाला आहे. यामुळे गोपनीयता कमी होऊन शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद व विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
उत्तर: सार्वजनिक किंवा खाजगी पदाचा गैरवापर करून स्वतःचा आर्थिक किंवा इतर फायदा करून घेणे म्हणजे भ्रष्टाचार होय. लाच घेणे, पैशांची अफरातफर करणे इत्यादी गोष्टी यात येतात. भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरील विश्वास उडतो आणि विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतात.
प्र. ८ (ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतीही एक):
प्र. ९ पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही एक):
उत्तर:
१. भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अन्वये निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे.
२. यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन अन्य निवडणूक आयुक्त असतात.
३. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
४. निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना सहजासहजी पदावरून दूर करता येत नाही.
५. सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते.
उत्तर: पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पर्यावरण चळवळ कार्य करते. तिची प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. जैवविविधतेचे रक्षण करणे.
२. जलस्त्रोतांचे संवर्धन करणे.
३. जंगलतोड थांबवणे आणि प्रदूषण कमी करणे.
४. शाश्वत विकासासाठी जनजागृती करणे (उदा. चिपको आंदोलन).
No comments:
Post a Comment