Adsense Ad Unit

Chapter 12.1: रंग मजेचे रंग उदयाचे Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 12: रंग मजेचे रंग उदयाचे


कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.



SOLUTION

डोंगरावर बिया उधळणे

बिया मातीत रुजून झाडे उगवणे

दाटीवाटीने झाडे उगवून भरगच्च रान तयार होणे

झाडांमुळे, रानांमुळे आभाळातून पर्जन्यवृष्टी होणे



आकृती पूर्ण करा.




SOLUTION

काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य:

१. मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देणे.

२. डोंगरावर बिया पेरून रान वाढवणे.

३. देशी झाडे रुजवणे.



वाक्य पूर्ण करा.

जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण- 



SOLUTION

जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण- फुलाफुलांचे दाट ताटवे.



कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट-


SOLUTION

कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट- सृष्टी



कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळाचे छत्र-



SOLUTION

आभाळाचे छत्र- आभाळाचे छत्र म्हणजे सृष्टीला लाभलेले अमर्याद, विस्तीर्ण असे आकाशाचे छत. या छताखाली सारे जग सुरक्षित आणि आनंदात जगत आहे.



गर्भरेशमी सळसळ-


SOLUTION

गर्भरेशमी सळसळ- पावसाच्या वर्षावानंतर नव्याने अंकुरलेल्या पानांची वाऱ्याच्या झुळकीमुळे जशी रेशमी, मुलायम सळसळ होते तशीच मानवाच्याही मनात पावसामुळे आलेल्या समृद्धीमुळे नाजूक, कोमल अशा आनंदी भावनांची रेलचेल सुरू असते. या सुखद रेलचेलीला गर्भरेशमी सळसळ असे म्हटले आहे.



कृती पूर्ण करा.

'कष्ट करणाऱ्यांना मदत करू' या आशयाची ओळ शोधा.



SOLUTION

मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी.



‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


SOLUTION

यंत्रांच्या संगतीने मानवाला काय मिळेल?



कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.


SOLUTION

दृष्टी - सृष्टी, पुष्टी - वृष्टी, कष्टी- तुष्टी, तुष्टी - गोष्टी



खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या

गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’



SOLUTION

'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आजच्या संगणकयुगातील मानवाने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, पर्यावरण संवर्धन करावे असा संदेश दिला आहे. जागतिकीकरणाच्या या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटू न देता निसर्गसाैंदर्याचा खराखुरा आनंद घ्यावा असा विचार यात व्यक्त होतो.

हिरवीगार सृष्टी पाहताना, हिरव्या रंगाच्या विविध छटा डोळ्यांत साठवताना मनेही हिरवीगार होऊन जातील असे कवयित्री म्हणते. ही हिरवळ समृद्धी, शुद्धता, आनंद यांचे प्रतीक असते. ती स्वत:मध्ये सामावून घेतल्यास आपली मनेही शुद्ध, समृद्ध आणि आनंदाने भरलेली होतील. पावसामुळे आलेल्या समृद्धीमुळे निर्माण होणारी मनातील भावनिक आंदोलने एक कोवळी, लुसलुशीत, रेशमी सळसळ मनात निर्माण करतील. या झाडांच्या नुकत्याच उमललेल्या कोवळ्या, तुकतुकीत, लुसलुशीत पानांच्या सळसळण्यातून आपण विश्वाला पर्यावरण संवर्धन व संगोपनाचा संदेश देत राहू, असा आशय कवयित्री वरील ओळींद्वारे मांडत आहे.



पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.


SOLUTION

'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आजच्या संगणकयुगातील मानवाने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, पर्यावरण संवर्धन करावे असा संदेश दिला आहे. जागतिकीकरणाच्या या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तोडू नये. यासाठी त्याने पर्यावरणाची जोपासना करावी तरच त्याला सुंदरशा निसर्गाचा खराखुरा आस्वाद घेता येईल असा विचार यात व्यक्त होतो.

काळ्या आईची म्हणजेच मातीची सेवा करायला हवी कारण या काळ्या आईच्या पोटातून उगवणाऱ्या अन्नावरच आपले पोषण होते. त्यामुळे, मातीत कष्टणाऱ्या कष्टकरी हातांना आधार देण्याची गरज आहे.

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. निसर्गातील जलचक्र बिघडत आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येकाने डोंगरउतारावर, मोकळ्या जागी बिया फेकल्या पाहिजेत. पावसाळ्यात या बिया जमिनीत रुजतील, त्यातून झाडे निर्माण होतील. या झाडांमुळे राने वाढतील. परिणामी, पाऊस पुरेसा पडू लागेल. उघडेबोडके डोंगर पुन्हा हिरव्यागार गालिच्याने सजतील. अशा निसर्गसुंदर वातावरणात राहिल्यावर मानवालाही निसर्गाचा खराखुरा आस्वाद घेता येईल आणि पृथ्वीवरील निसर्गसृष्टीचे पर्यायाने येथील पर्यावरणाचे संवर्धन होईल, असे कवयित्रीला वाटते.



वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.


SOLUTION

पावसात न्हाऊन निघालेली, जणू हिरवा शालू नेसलेली वसुंधरा (पृथ्वी) दिवसेंदिवस कुरूप होत चालली आहे. प्रगतिच्या नावाखाली तिचे साैंदर्य ओरबाडले जात आहे. तिचे हिरवेपण जपण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण/वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन करण्याची खूप आवश्यकता आहे.

केवळ 'झाडे लावा' असे म्हणून चालणार नाही, तर लावलेली झाडे 'जगवा' असे म्हणावे लागेल. त्याकरता प्रत्येकाने आपल्या नावाने किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एक तरी झाड लावून जोपासले पाहिजे. तसेच, झाडापासून बनवलेल्या प्रत्येक वस्तूचा व निसर्गातील साधनसंपत्तीचा जपून व काटकसरीने वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, कागद.

कागद बनवण्यासाठी झाडे कापावी लागतात. त्यामुळे, कागदाचा योग्य तेवढा वापर करायला हवा किंवा उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या पर्यायी कागदाचा वापर करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे.

तसेच, वनांसाठी राखीव जागा ठेवणे, इमारतींच्या आवारात शाळा -महाविद्यालयांत झाडे लावणे, पाण्याचा थेंब न् थेंब जपून वापरण्यासाठी कार्यशाळा राबवणे असे उपक्रम घेता येतील. पर्यावरण संवर्धनाशी संबंधित स्पर्धा आयोजित करून लोकसहभागातून वसुंधरेचे संवर्धन व संगोपन करण्याकरता पुढाकार घेता येईल, असे मला वाटते.